Cotton Rate : शेतकऱ्यांच्या मनात तोच दर बाजारात, खरिपातील केवळ एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टी, अवकाळी आणि पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादनात घट झाली असली तरी जे पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे त्याचे खऱ्या अर्थान चीज होत आहे. कारण कापसाला 10 हजाराचा दर मिळावा यासाठीच शेतकऱ्यांनी साठवणूकीचा अट्टाहास केला होता. अखेर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि अनसिंग येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळालेला आहे.

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या मनात तोच दर बाजारात, खरिपातील केवळ एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:24 AM

वाशिम : केवळ सोयाबीनवरच नाही तर सबंध खरीप हंगामावरच यंदा नैसर्गिक संकट होते. अतिवृष्टी,  (Untimely Rain) अवकाळी आणि पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे (Cotton) कापूस उत्पादनात घट झाली असली तरी जे पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे त्याचे खऱ्या अर्थाने चीज होत आहे. कारण कापसाला 10 हजाराचा दर मिळावा यासाठीच शेतकऱ्यांनी साठवणूकीचा अट्टाहास केला होता. अखेर (Washim District) वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि अनसिंग येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळालेला आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. खरीप हंगाम अतिम टप्प्यात असताना कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीचा घेतलेला निर्णय आज फायदेशीर ठरत आहे.

सरकीच्या दरातही दुपटीने वाढ

कापसाच्या दरात वाढ झाल्याने आपोआपच सरकीच्या दरातही वाढ झाली आहे. सरकी हे पशूखाद्य म्हणून वापरले जाते. यापूर्वी 2 हजार 800 रुपये प्रति क्विंटल असलेली सरकी आता थेट 4 हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे दुबत्या जनावरांना आवश्यक असलेले खाद्य आता महागले आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्य पर्यायाचा शोध घेत आहेत. मात्र, खुल्या बाजारपेठेत कापसाने 10 हजारी ओलांडली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

दर वाढीमध्ये शेतकऱ्यांचीही भूमिका महत्वाची

मध्यंतरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाची निर्यात कमी झाल्याने दर घटणार असे चित्र निर्माण केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी घटत्या दरात कापूस विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवरच अधिकचा भर दिला होता. परिणामी मागणीच्या तुलनेत कापसाचा पुरवठा झाला नसल्याने दरात वाढ होत गेली. नववर्षाच्या सुरवातीपासून सुरु असलेल्या या दरवाढीने आता 10 हजाराचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे खरिपातील सर्व पिकांमधून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नसले तरी मात्र, पांढऱ्या सोन्याने दिलासा दिलेला आहे.

आवकमध्ये विक्रमी वाढ

वाढलेल्या दराचा परिणाम कापूस आवकवर झालेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने वाशिम जिल्हाभरातील खरेदी केंद्रावर आवक वाढलेली आहे. दिवसाकाठी 10 हजार क्विंटलची आवक होत आहे. शिवाय अजूनही दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी टप्प्याटप्प्याने विक्री करीत आहेत. बाजारपेठेतले गणित शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानेच हा बदल होती आहे. दर कमी झाल्यास आणि दरात वाढ झाल्यास काय करावे याचे समीकरण शेतकऱ्यांनी स्वत:च ठरवल्याने दर वाढीमध्ये शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : हरभरा फुलोऱ्यात, घाटीअळीचे करा असे एकात्मिक व्यवस्थापन

‘ई-पीक पाहणी’ आता ‘ई- गिरदावरी’, महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.