Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी

पीक पध्दतीमध्ये बदल हा केवळ रब्बी हंगामापूरताच मर्यादित राहिलेलान नाही तर लेट उन्हाळी हंगामातही तो सुरुच आहे. खरिपात सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामातून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयोग केले आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तब्बल 18 हजार हेक्टरावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:07 AM

औरंगाबाद: पीक पध्दतीमध्ये बदल हा केवळ रब्बी हंगामापूरताच मर्यादित राहिलेलान नाही तर लेट (Summer Season) उन्हाळी हंगामातही तो सुरुच आहे. खरिपात सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामातून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) एक ना अनेक प्रयोग केले आहेत. (Marathwada) औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तब्बल 18 हजार हेक्टरावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यामुळे खरिपातील बियाणांची तर चिंता मिटलेली आहेच पण उतारा जर अधिकचा पडला तर यामधून चार पैसेही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहेत. खरीप हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले पण पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचे धाडस याच नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी केले आहे. उन्हाळी सोयाबीनला उतारा कमी असतो असे सांगितले जाते पण पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे शिवाराचे चित्रच बदलले आहे.

सध्या फुल अवस्थेत सोयाबीन

केवळ रब्बी हंगामाताच नाही तर उन्हाळ्यातही उशिरा का होईना सोयाबीनचा पेरा हा झालेलाच आहे. पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला फुले आणि शेंगा लागलेल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची हमी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरवर्षी केवळ ज्वारी, हरभरा आणि गव्हावरच शेतकऱ्यांचा भर असतो. यंदा मात्र, मोहरी, सुर्यफूल, भुईमूग, राजमा अशा वेगवेगळ्या पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मध्यंतरीची अवकळी आणि ढगाळ वातावरण वगळता इतर कशाचाही धोका नसल्याने पीके बहरात आहेत.

असा आहे औरंगाबाद विभागतला सोयाबीन पेरा

औरंगाबाद विभागात यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. दरवर्षी सोयाबीनचे पीक घेतले जाते पण केवळ खरिपातील बियाणांची उपलब्धता व्हावी म्हणून. पण यंदा उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी हा बदल घडवून आणला आहे. जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 8 हजार 206 हेक्टरावर, बीड जिल्ह्यामध्ये 7 हजार 950 हेक्टरावर पेरा झाला आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 3 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे. त्यामुळे बियाणांचा तर प्रश्न मिटणारच आहे पण शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनही पडणार आहे.

सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

बहरात असलेल्या सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकाच्या शेंड्याकडील भाग हा वाळत आहे. जर याच किडीने बुडापर्यंत शिरकाव केला तर मात्र, उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे वेळीच थायामिथोक्झाम (30 एफ. एस.) 0.25 मि.लि. (50 मि.लि. प्रति एकर) किंवा इथिऑन 3 मि.लि. (600 मि.लि. प्रति एकर याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, आता योग्य नियोजन हाच पर्याय!

Intercropping : उत्पादन वाढीसाठी कायपण? ऊसतोडणी होताच शेतकऱ्यांची भन्नाट Idea..!

PM Kisan Yojna : दोन कागदपत्रावरच होणार ‘ई-केवायसी’, 11 व्या हप्त्याची तारीखही ठरली!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.