Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल
ज्याप्रमाणे शेतीमालाचे बाजारभाव हे लहरीपणाचे ठरत आहेत अगदी त्याच पध्दतीने पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. उत्पन्नात घट होताच किंवा अधिकचा फायदा न झाल्यास लागलीच शेतकरी इतर पिकांचा विचार करतात. मात्र, नुकसानीनंतरही धाडस केल्यास काय होऊ शकते हे यंदा कलिंगड उत्पादकांकडे पाहिल्यावर लक्षात येत आहे. गेल्या दोन वर्षात कलिंगड काढणीच्या दरम्यानच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा कलिंगडाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती.
कराड : ज्याप्रमाणे शेतीमालाचे बाजारभाव हे लहरीपणाचे ठरत आहेत अगदी त्याच पध्दतीने (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. उत्पन्नात घट होताच किंवा अधिकचा फायदा न झाल्यास लागलीच शेतकरी इतर पिकांचा विचार करतात. मात्र, नुकसानीनंतरही धाडस केल्यास काय होऊ शकते हे यंदा (Watermelon) कलिंगड उत्पादकांकडे पाहिल्यावर लक्षात येत आहे. गेल्या दोन वर्षात कलिंगड काढणीच्या दरम्यानच (Lockdown) लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा कलिंगडाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. पण आता परस्थिती बदलली आहे. बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या झाल्या आहेत तर वाढत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढही झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. कलिंगड खरेदीसाठी व्यापारी थेट बांधावर येत असून कलिंगडला 12 ते 14 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे यंदा ज्या शेतकऱ्यांनी धाडस केले ते मालामाल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कमी काळात अधिकचे उत्पन्न
कलिंगड हे हंगामी पीक आहे. लागवडीपासून केवळ 70 दिवसांमध्ये हे वावराबाहेर काढले जाते. पाण्याचा साठा आणि योग्य नियोजन करुन जोपसणा केली तर हे खात्रीचे पीक समजले जाते. कराड तालुक्यातील काले गावच्या संदिप थोरात यांनी एक एकर कलिंगड लागवड केली होती. 60 दिवसात पिकही जोरदार आले असून पंचवीस टन उत्पन्न अपेक्षित आहे. पहिल्या तोडणीत प्रत्येक कलींगड फळ वजनाला चार किलोपेक्षा जास्त भरते आहे. शेतात जागेवर 10 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतोय त्यांच्या कलिंगडाला राज्याबाहेरील बाजारपेठातुन मागणी वाढली आहे.
बाजारपेठा खुल्या अन् मागणीतही वाढ
कलिंगड बाजारपेठेत दाखल होत असतानाच आता बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. कोरोनाचे कोणतेही निर्बंध राहणार नाहीत त्यामुळे खुल्या बाजारपेठेचा परिणाम आता कलिंगड विक्रीवरही होणार आहे. गेल्या दोन वर्षात उत्पन्न निघाले पण शेतकऱ्यांना कलिंगड विक्री करता आले नाही. यंदा बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत तर वाढत्या उन्हामुळे मागणीही वाढली आहे. उन्हामध्ये वाढ झाल्याने कलिंगडचे दर हे थेट 12 ते 14 रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांमधून उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद आहे.
यामुळे घटले क्षेत्र, मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा
गेल्या काही दिवसांपासून हंगामी पीक म्हणून कलिंगडच्या क्षेत्रात वाढ होत होती. पण गेल्या दोन वर्षात या पिकातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यातच लागवडीच्या दरम्यानच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीकडे दुर्लक्ष केले होते. पण सध्याचे चित्र उलटेच आहे. मागणीत वाढ आणि उत्पादनात घट झाल्याने यंदा कलिंगड विक्रमी दरात विकले जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर
Rabi Season : पीक पदरात आता चिंता जनावरांच्या चाऱ्याची, ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकचा दर