E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?

खरीप हंगामात 'ई-पीक पाहणी' ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही झाला होता. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. एवढे सर्व होऊन देखील रब्बी हंगामात 'ई-पीक पाहणी'च्या माध्यमातून नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 4:30 PM

नांदेड : खरीप हंगामात (E-Pik Pahani) ‘ई-पीक पाहणी’ ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक (Records of crops) पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही झाला होता. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. एवढे सर्व होऊन देखील (Rabi Season) रब्बी हंगामात ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कारण ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून आतापर्यंत केवळ 25 हजार एवढ्या शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे नेमके गणित कुठे चुकले असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात 3 लाख 50 हजार हेक्टरावर पेरणी झाली आहे. मात्र, मोबाईल अॅपच्या माध्यमातून पिकांच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यात नुकासन देखील होणार आहे.

खरिपात जोमात, रब्बीत मात्र कोमात

खरीप हंगामाच्या दरम्यान ई-पीक पाहणी ही प्रणाली नवीन होती. त्यामुळे शेतकरी कशा नोंदी करणार हा प्रश्न प्रशासनापुढे होता. असे असतानाही राज्यात 89 लाख शेतकऱ्यांनी नोंदी केल्या होत्या. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या झाल्या होत्या. त्यावेळी महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती. याशिवाय बांधावर जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे उद्दीष्टाप्रमाणे शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या झाल्या होत्या. आता रब्बी हंगामात पिक नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

केवळ 25 हजार खातेदारांनीच केल्या नोंदी

खरिपाप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात ना शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता ना प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये. त्यामुळे ‘ई-पीक पाहणी’ मध्ये केवळ 25 हजार खातेदारांनीच पिकांच्या नोंदी केल्या आहेत. खरीप हंगामात 1 लाख 93 हजार 709 जणांनी पिकांच्या नोंदी केल्या होत्या. त्यामुळे रब्बी हंगामात यामध्ये अणखीन वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पीक पेऱ्याच्या नोंदणीची अंतिम मुदत जवळ येत असातानाही या मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकासान झाले तर शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत साशंका आहे.

हरभरा विक्रीसाठीही अडचण

हरभरा काढणीला सुरवात झाली आहे. आता हमी भाव केंद्र सुरु झाल्यावर या केंद्रावरच शेतकऱ्यांना हरभऱ्याची विक्री करावी लागणार आहे. मात्र, याकरिता ऑनलाईन पेरा नोंदणी केलेला सातबारा आवश्यक आहे. असे असतानाही पेरलेल्या पिकांच्या नोंदी ह्या ई-पीक पाहणीच्या माध्यमातून केलेली नाही. त्यामुळे आता खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.

संबंधित बातम्या :

Turmeric : राजापुरी हळदीचा ‘राजेशाही’ थाट..! आवक सुरु होताच विक्रमी दर

Sugarcane : ऊसाचे क्षेत्र वाढूनही मोबदला मिळेना, काय आहेत फडातल्या अडचणी?

Latur Market: शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, सोयाबीन दर स्थिरावले, आता घ्या निर्णय..!

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.