Monsoon Update : तीन दिवस पावसाचेच, राज्यात ‘रेड अलर्ट’, काय राहणार पावसाची स्थिती?
जून महिन्यात कायम पावसाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय आला होता. या महिन्यात केवळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची कृपादृष्टी राहिली होती. पण जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चित्र बदलले आहे. केवळ विशिष्ट भागातच नाहीतर सबंध राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या जोरावर खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्या तर पूर्ण झाल्याच पण आता अधिकच्या पावसामुळे ही पिके देखील धोक्यात आली आहेत.
मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून (Maharashtra) राज्यात सुरु असलेल्या पावसापासून केव्हा दिलासा मिळेल असे प्रत्येकालाच वाटत आहे. पण सध्याच्या रिमझिम आणि (Heavy Rain) मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला 3 दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण आगामी तीन दिवसासाठी (Meteorological Department) हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणिय स्थितीचा परिणाम राज्यातील मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केवळ कोकण, मध्य महाराष्ट्रच नाहीतर मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
पावसाचा अंदाज घ्या अन् घराबाहेर पडा
राज्यातील चारही विभागामध्ये मान्सून आता सक्रीय झाला आहे. केवळ सक्रीयच नाहीतर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे त्याने जुलै महिन्यात आपले रुपडेही बदलले आहे. जून महिन्यात मान्सूनचा लहरीपणा पाहवयास मिळाला असला तरी जुलैमध्ये सबंध राज्यात धो-धो बरसत आहे. आणखी तीन ते चार दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाहीतर नागरिकांनी घराबाहेर पडताना त्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने हा सल्ला विभागाकडून देण्यात आला आहे.
11 Jul,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,पश्चिम किनार्यावरील द्रोणिय स्थिती,20°N पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित;परिणामी ह्या ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाउस,मराठवाड्यातही जोर pic.twitter.com/mYMZNxDk9U
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 11, 2022
चारही विभागात दणक्यात पाऊस
जून महिन्यात कायम पावसाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय आला होता. या महिन्यात केवळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची कृपादृष्टी राहिली होती. पण जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चित्र बदलले आहे. केवळ विशिष्ट भागातच नाहीतर सबंध राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या जोरावर खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्या तर पूर्ण झाल्याच पण आता अधिकच्या पावसामुळे ही पिके देखील धोक्यात आली आहेत. शिवाय आता आगामी चार दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये पाणीसाठा
राज्यासह पुणे जिल्ह्यामध्येही पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसामध्ये सातत्य असल्याने जिल्ह्यातील धरणासाठ्यात वाढ झाली आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे खडकवास धरणातून तर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी सुर्यदर्शनही झालेले नाही. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप ही सुरुच आहे.