Red Chilies Prices increased : अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादनात घट, दरामध्ये यावर्षी जवळपास शंभर रूपयांनी वाढ
मसाल्यासाठी लागणारे लाल मिरची (Red Chilies) विक्रीस दाखल झाली आहे. पण यंदा मात्र मिरचीच्या दरामध्ये यावर्षी 100 रुपयांच्या जवळपास वाढ झाली आहे.
मुंबई – मसाल्यासाठी लागणारे लाल मिरची (Red Chilies) विक्रीस दाखल झाली आहे. पण यंदा मात्र मिरचीच्या दरामध्ये यावर्षी 100 रुपयांच्या जवळपास वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर राज्यात झालेल्या पावसामुळे मिरची उत्पादनात घट झाली आहे. लाल मिरचीच्या दरात वाढ झाली असल्याने गृहिणींचे बजेट (Budget) कोलमडण्याची शक्यता आहे. यापुढे देखील लाल मिरचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मिरची उत्पादनात घट झाली आहे. यंदा मिरचीचे 40 टक्के उत्पादन झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 70 ते 80 रुपयांनी दरात वाढ झाली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्केचं उत्पादन
येवलासह नाशिक जिल्ह्यात जी लाल मिरची येते. ती जास्त करून आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची येत असते. मात्र गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्केचं उत्पादन मिरचीचे झाले आहे. मिरचीचे कमी उत्पादन झाल्याने यंदा मिरची खरेदी करताना तुम्हाला 70 ते 80 रूपयांनी महाग असेल. तसेच काही वेगळ्या आणि चांगल्या जातीच्या मिरच्या खरेदी करताना चक्क शंबर रूपये जादा द्यावे लागतील. तसेच यापुढे मिरचीचे भाव वाढणार असल्याची शक्यता मिरची व्यापारी उत्कर्ष गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
100 रुपयांनी भाव वाढले
लाल मिरचीचे भाव मागील वर्षी दीडशे ते पावणे दोनशे रुपये होते. मात्र यावर्षी मिरचीच्या भावांमध्ये अडीशे, तीनशे रुपये पर्यंत गेल्याने जवळपास 100 रुपयांनी भाव वाढले आहेत. गृहिणीना मसाला तयार करण्याकरिता मिरची महागड्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली असल्याची माहिती सोनाली जाधव यांनी सांगितली.