Onion Market : येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा देणारा भाव
यंदाच्या हंगामात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून कांद्याची आवक झाली असली तरी वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीच्या आवारात करण्यात आले होते. लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या कांद्याला तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे.
लासलगाव : यंदाच्या हंगामात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल (Onion Market) कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून (Onion Arrivals Decrease) कांद्याची आवक झाली असली तरी वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीच्या आवारात करण्यात आले होते. लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या कांद्याला तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे. आवक कमी प्रमाणात असली तरी लाल कांद्याला मिळालेला दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे.
नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि नाशिक येथील बाजारपेठेतच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. पण आता साठणूकीतला लाल कांदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. खरीपातील लाल कांदा अद्यापही बाजारपेठेत दाखल झालेला नाही. शिवाय साठवणूकीतला कांदाही आता अंतमि टप्प्यात आहे त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
कांदा दर वाढीच्या अपेक्षा वाढल्या
साठवणूकीतला कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. तर यंदा पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचे नुकसान झाले आहे. तर मध्यंतरीच्या अवकाळीमुळे कांद्याची काढणी लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक ही घटत आहे. मध्यंतरी आयात केलेला कांदा बाजारपेठेत दाखल झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर हे थेट 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते. मात्र, पुन्हा बाजारात कांद्याची आवक ही कमी होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे उन्हाळी कांद्याची साठवणूक करुन ठेवतात व योग्य दर मिळाताच विक्री करतात. मात्र, साठवणुकीतलाही कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये गुरुवारी दाखल झालेल्या कांद्याला 2301 रुपये असा दर मिळालेला आहे.
खरिपातील कांदा वावरातच
खरीप हंगामातील सर्वच पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे. यामधून आता कांद्याचीही सुटका झालेली नाही. कारण चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या काढणीची कामे आता लांबणीवर पडलेली आहेत. दिवाळी झाली की, खरिपातील लाल कांद्याची आवक सुरु होत असते पण पावसामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडले आहे. त्यामुळे नविन कांदा बाजारात दाखल होण्यास अजूनही 15 दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
आवक घटल्याने दर वाढणार
कांद्याचे दर हे एका रात्रीतून वाढतात. यंदाही वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला की, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. एवढेच नाही कांद्याची आवकही सुरु करण्यात आली होती. त्यामुळे 4 हजारवर पोहचलेला कांदा थेट 1 हजार रुपये क्विंटलवर आला होता. पण आता साठवणूकीतला उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आहे तर खऱिपातील कांदा बाजारात येण्यासाठी बराच आवधी लागणार आहे. त्यामुळे अजून 10 दिवस तरी कांद्याचे दर हे टिकून राहतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.