अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा

कृषी विभागाने तत्परता दाखवत वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल अवघ्या दोनच दिवसांमध्ये तयाक करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.

अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:52 PM

वर्धा : रब्बी हंगामातही नैसर्गिक संकट कायम आहे. दर महिन्याला (Untimely rain) अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके थेट कोमात जात आहेत. पुन्हा शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्ची करुन पिकांची जोपासणा करावी लागत आहे. यामध्ये मात्र, (Agricultural Dipartment) कृषी विभागाने तत्परता दाखवत (Wardha District) वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल अवघ्या दोनच दिवसांमध्ये तयाक करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.

वर्धा जिल्ह्यात 3 हजार 54 हेक्टरावरील पीक बाधित

जिल्ह्यात 8 आणि 9 जानेवारी रोजीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे 3 हजार 54 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी रोजीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरीपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून 1 हजार 765 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात 562 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून कारंजा तालुक्यात 727 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. यामध्ये गव्हाचे 289 हेक्टरवर नुकसान झाले असून हरभरा 1 हजार 196 हेक्टर, कापूस 84 हेक्टर, तूर 759 हेक्टर, उस 3 हेक्टर, फळपिके 666 हेक्टर, इतर पिकांचे 57 हेक्टरवर नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील कापूस अंतिम टप्प्यात होता तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके जोमात असतानाच नुकसान झाले आहे.

पावसाने फळपिकाचा दर्जाही खालावला

अवकाळी आणि गारपिटमुळे केवळ रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर फळबागांवरही याचा विपरीत परिणाम झालेला आहे. जिल्ह्यात तब्बल 666 हेक्टरावरील फळबागांना फटका बसलेला आहे. यामध्ये आंबा, काजू यासारख्या फळांचा समावेश आहे. पावसामुळे ही फळे डागाळली जाणार आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेली अवकाळी ही सर्वच पिकांसाठी नुकसानीची ठरलेली आहे. आता नुकसानीचा अहवाल तर सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे मदतीची.

संबंधित बातम्या :

Cotton Production : शेवटी बाकी शून्यच ? कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट

Sesame Prices : संक्रातीच्या सणातही तीळाच्या दरात तेजीच, काय आहेत कारणे?

हमीभाव केंद्र 10 दिवसापुरतेच, आधारभूत किंमतीपेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा भाव, कसे बदलले तूरीचे दर?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.