Farming : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने तज्ज्ञासारखी सुरू केली भाजीपाला लागवड, असे वाढत आहे उत्पन्न
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव कृष्ण चंद आहे. ते करनाल जिल्ह्यातील बल्ला गावातील रहिवासी आहेत. ते आधी जल संरक्षण विभागात नोकरीला होते.
नवी दिल्ली : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कुणी कमीत-कमी पाण्यात जास्त आणि चांगली पिकं कशी घेत आहेत, याचा विचार करतो. तर कुणी गोआधारित शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पॉली हाऊसची शेती करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेतले आहे. हरियाणातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आधुनिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी आदर्श तयार केला आहे. हे सेवानिवृत्त कर्मचारी पॉली हाऊसमध्ये भाजीपाला काढत आहेत. यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करून पाण्याची बचत करत आहेत. शिवाय लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अशा पद्धतीची शेती केली तर लाखो लीटर पाणी वाचऊ शकता. गावातील इतर शेतकरीही त्यांच्या पद्धतीची शेती शिकत आहेत.
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव कृष्ण चंद आहे. ते करनाल जिल्ह्यातील बल्ला गावातील रहिवासी आहेत. ते आधी जल संरक्षण विभागात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी पाणी बचतीवर बरेच काम केले. सेवानिवृत्त झाल्यानंतर पाणी वाचवण्यासाठी तांत्रिक पद्धतीने शेती सुरू केली. कृष्ण चंद यांचे असे म्हणणे आहे की, संरक्षित शेती केल्याने पाण्याची अधिक बचत होते. शिवाय पारंपरिक शेतीच्या तुलनेत चांगली कमाई होते. अशावेळी सर्व शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक पद्धती स्वीकारली पाहिजे.
पॉलीहाऊस आणि नेट हाऊसमध्ये अनेक भाजीपाल्याचे उत्पन्न
कृष्ण चंद २०२० पासून पॉली हाऊसमध्ये हिरव्या भाजीपाल्याची शेती करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलीहाऊसच्या शेतीतून चांगेल उत्पन्न मिळत आहे. कृष्ण चंद यांचे म्हणणे आहे की, फळबाग लागवडीसाठी सरकार अनुदानही देत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी हिरव्या भाजीपाल्याची शेती करावी. त्यांच्या पॉली हाऊस आणि नेट हाऊसमध्ये काकडी, शिमला मिरची, टरबूजसह अन्य उत्पादने घेतली जातात.
परंपरागत शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी लागते
कृष्ण चंद म्हणतात की, त्यांनी जल संरक्षण विभागात नोकरी केली. त्यामुळे त्यांना पाण्याची किंमत चांगली समजते. परंपरागत शेतीत पाणी मोठ्या प्रमाणात लागते. पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे की, पाण्याचा वापर त्यांनी कमी केला पाहिजे.