महागाईच्या वणव्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ, Basic गरजांच्या पूर्ततेसाठी तारेवरची कसरत

सध्याच्या उन्हाच्या चटक्यापेक्षाही महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. अन्नधान्यापासू ते पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांचे जगणे देखील मुश्किल झाले आहे. महागाईचा भडका हा खिशापर्यंत आल्याने त्याची जाणीव आता अधिक तीव्रतेने होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कडधान्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे.

महागाईच्या वणव्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ, Basic गरजांच्या पूर्ततेसाठी तारेवरची कसरत
वाढत्या महागाईत चिंता वाढवणारी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 3:26 PM

नागपूर : सध्याच्या उन्हाच्या चटक्यापेक्षाही (Inflation) महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. अन्नधान्यापासू ते (Petrol-Diesel) पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांचे जगणे देखील मुश्किल झाले आहे. महागाईचा भडका हा खिशापर्यंत आल्याने त्याची जाणीव आता अधिक तीव्रतेने होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये (Pulses rate) कडधान्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. याची सुरवातच मुळात अन्नधान्यापासून झाली असून हे सर्व कुठे नेऊन थांबणार याची कल्पनाही करवत नाही अशी स्थिती आहे. नागपूरमध्ये अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तांदळाच्या दरात 300 प्रति क्विंटलमागे वाढ झाली आहे तर तूर दाळीच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे.

धान्याच्या दरात वाढ

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली होती. त्याचे परिणाम आता थेट धान्याच्या दरावर झाल्याचे पाहवयास मिळत आहे. जेवणाच्या ताटातील सर्वच धान्य हे महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर महागाईचा थेट परिणाम झाला आहे. दाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. घटलेले उत्पादन आणि वाढलेली मागणी याचा हा परिणाम आहे. शिवाय अन्नधान्य वाहतूकीसाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणामही महागाईवर झाला आहे.

रशिया-युक्रेन युध्दामुळे डिझेल दरात वाढ

रशियातून भारतालाच नव्हे अधिकतर देशांना डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र, सध्याच्या रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम थेट पुरवठ्यावर होत असून डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शिवाय डिझेलचे दर वाढली की वाहतूक खर्चामध्येही वाढ होत असल्याने जीवनाश्यक वस्तूंचे दर वधारले आहेत.

अशी झाली आहे अन्नधान्याच्या किंमतीमध्ये वाढ

महागाईच्या झळा थेट अन्नधान्यापर्यंत येऊन पोहचल्या आहेत. यामध्ये दाळी, गहू आणि तांदळाचा समावेश आहे. तूर दाळीच्या दरात प्रति क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर तांदळाच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली असून अधिकचे उत्पादन घेतले जाणाऱ्या गव्हाच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्याच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे.

रासायिनक खतावरही परिणाम

रशिया-युक्रेन युध्दामुळे खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याच बरोबर आता रासायनिक खताच्या दरात वाढच नाही तर रशियातून होणाऱ्या रासायनिक खताच्या आयातीवरच परिणाम होणार आहे. भारताला वर्षभर लागणाऱ्या खतापैकी 12 टक्के म्हणजेच दरवर्षी 70 लाख टन डीएपी खताचा पुरवठा केला जातो. यंदा मात्र, अद्यापपर्यंत ही आयातच झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामात खताचा तुटवडा भासणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत

Soybean Market : सोयाबीनच्या दरात वाढ, साठवणूक की विक्री प्रश्न कायम..!

Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.