Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

वाढत्या उन्हामुळे हंगामी पिकांच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत कलिंगड, लिंबू याच्या दरात वाढ झाली आहे. पण नैसर्गिक गारवा असलेली काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झालं नाही ते हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. काकडी ही आरोग्यासाठी चांगली असते शिवाय यामध्ये नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात
यंदा शेतकऱ्यांनी हंगामी पिकातून अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:17 AM

नांदेड : वाढत्या उन्हामुळे (Seasonable Crop ) हंगामी पिकांच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत कलिंगड, लिंबू याच्या दरात वाढ झाली आहे. पण नैसर्गिक गारवा असलेली (Cucumber crop) काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झालं नाही ते हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. काकडी ही (Health) आरोग्यासाठी चांगली असते शिवाय यामध्ये नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. यातच शेतकरी कुण्या व्यापाऱ्याला काकडी विकत नाही तर स्वत:च मार्केट जवळ करीत असून अधिकचा नफा घेत आहे. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाबरोबर विक्रीमध्येही बदल करुन शेतकरी उत्पन्नात वाढ करीत आहे.नांदेड जिल्ह्यामध्ये हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे.

यामुळे हंगामी पिकांच्या क्षेत्रात वाढ

कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न यासाठी हंगामी पिके हे चांगले माध्यम झाले आहे. पण दरवर्षी पाण्याची निश्चितता नसते. त्यामुळे शेतकरी हे पीक पध्दतीमध्ये बदल करण्यास धजावत नाहीत. पण यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने भर उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली होती. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. नांदेडमध्ये यंदा प्रथमच काकडी क्षेत्रात वाढ झाली आहे.

दोन महिन्यात पीक पदरात

हंगामी पिकांची जोपासणा व्यवस्थित झाल्यास यामधून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. काकडी, कलिंगड हे दोन महिन्यात उत्पन्न देणारी पिके आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमधील बदल यशस्वी ठरत आहे. दोन महिन्यात उत्पादन होणारे काकडीचे पीक आता काढणीला आलय, त्यातच नांदेडचे तापमान 42 अंशाच्या आसपास गेल्याने नैसर्गिक गारवा देणाऱ्या काकडीची मोठी मागणी वाढली आहे.

शेतकरीच विक्रेत्याच्या भूमिकेत

शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढत आहे पण योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्नात भर पडत नाही. उलट जे व्यापारी, मध्यस्ती आहेत ते अधिकचा फायदा घेतात. इतर शेतीमाल शेतकऱ्यांना स्वत:हून विक्री करता येत नसला तरी हंगामी पिकांची विक्री करता येते म्हणूनच काकडी, कलिंगड याची विक्री शेतकरीच करताना पाहवयास मिळत आहे. यामुळे कोणी मध्यस्ती राहत नाही शिवाय सर्व नफा शेतकऱ्यांच्या पदरीच. ग्राहकांना चांगला माल कमी किंमतीमध्ये मिळाल्याचे समाधान होते. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाने शेतकऱ्यांना तारले आहे.

संबंधित बातम्या :

Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!

‎SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग ‘या’ योजनेचा लाभ घ्याच..!

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.