Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यात स्प्रिंक्लरचाच आधार, पाणीसाठा मुबलक तरीही शेतकरी का आहे त्रस्त?
खरिपात अंतिम टप्प्यात अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. तर आता रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यात असताना वाढत्या तापमानाचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. दिवस उजाडताच प्रखर ऊन पडत असून दिवस मावळेपर्यंत हीच अवस्था आहे. यामुळे शेतीकामे करणे तर मुश्किल झाले आहे पण उन्हाळी सोयाबीन, राजमा या पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयबीन हे पावसाळी पिक असल्याने पाण्याची मोठी आवश्यकता असते.
नांदेड : खरिपात अंतिम टप्प्यात अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. तर आता रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यात असताना वाढत्या (Temperature Increase) तापमानाचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. दिवस उजाडताच प्रखर ऊन पडत असून दिवस मावळेपर्यंत हीच अवस्था आहे. यामुळे शेतीकामे करणे तर मुश्किल झाले आहे पण (Summer Crop) उन्हाळी सोयाबीन, राजमा या पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयबीन हे पावसाळी पिक असल्याने पाण्याची मोठी आवश्यकता असते. यंदा अधिकच्या पावसामुळे हे शक्यही झाले आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढते ऊन आणि वातावरणातील बदल यामुळे उत्पादनावर काय परिणाम होणार का या विवंचनेत शेतकरी आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाचा आधार घेऊन ही पिके जोपासावी लागणार आहेत. अंतिम टप्प्यात दुर्लक्ष झाले तर जी खरिपाची अवस्था तीच रब्बीची अशी स्थिती निर्माण होणार आहे.
उन्हामुळे पिके पडली पिवळी
वाढत्या ऊन्हाचा परिणाम थेट खरीप हंगामातील पिकांवर झालेला आहे. बहरात असणारे सोयबीन, राजमा, तीळ ही पीके पिवळी पडत आहेत. पाण्याचा पुरवठा असला तरी वाढत्या ऊन्हामुळे ही परस्थिती ओढावत आहे. सोयाबीन हे पावसाळी पीक आहे. जेवढे पाणी देईल तेवढे कमीच राहणार आहे. त्यामुळे आता पाठाद्वारे नाही तर स्प्रिंक्लरचाच आधार घेतला जात आहे. कारण यामुळे पाण्याचा अपव्यय तर होत नाहची शिवाय सातत्याने पाणी सुरु राहल्याने जमिनीतील ओल टिकून राहणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून जोपासणा झाली असताना आता हे पीक हातेच जाऊ दिले जाणार नाही. यासाठी शेतकऱ्यांची प्रयत्नाची पराकष्टा सुरु झाली आहे.
तर उत्पादनावर परिणाम
पिके बहरात असतानाच पाणी पुरवठा कमी झाला तर मात्र, उत्पादनावरच परिणाम होणार आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठीच शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आतापर्यंत योग्य नियोजन आणि पाण्याची उपलब्धता होती. आता अंतिम टप्प्यात पिकांना धोका निर्माण होणार नाही यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे.
कृषिकज्ञांचा काय आहे सल्ला?
यंदा कधी नव्हे ते उन्हाळी हंगामात सोयाबीन क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन हे पावसाळी पीक आहे असे असताना केवळ पाण्याच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. त्यामुळे आता उर्वरीत काळात शेतकऱ्यांनी पाठाद्वारे नाही तर स्प्रिंक्लरचा वापर करुनच पाणी देणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी दिवसा पाणी देण्याऐवजी दिवस मावळता किंवा रात्री पाणी दिल्यास त्याचा अधिक फायदा होणार आहे. सध्या सोयाबीन फूल लागण्याच्या अवस्थेत असून आता काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Drip Irrigation : सरकारचा एक निर्णय अन् लाखो शेतकऱ्यांचा फायदा, उत्पादनवाढीसाठी काय आहे धोरण?
मक्याच्या दरात वाढ फायदा तांदूळ उत्पादकांना, रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतीय शेतीमालाला मागणी
Onion : कांद्याच्या घटत्या दरावर रामबाण उपाय, ना वाहतूकीचा खर्च ना दरातील चढ-उताराची धाकधूक..!