अजित पवारांची कार्यपद्धत फॉलो, रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये

रोहित पवार हे पहाटे चार वाजताच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. (Rohit Pawar Navi Mumbai APMC)

अजित पवारांची कार्यपद्धत फॉलो, रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 9:25 AM

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कामाची पाहणी असो वा उद्घाटन, अजितदादा न चुकता वेळेवर पोहोचतात. अजित पवारांच्या कामाची पद्धत त्यांचा पुतण्याही फॉलो करताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही भल्या पहाटे नवी मुंबई एमपीएमसी मार्केट गाठले. (Rohit Pawar visits Navi Mumbai APMC Market at 4am)

रोहित पवार हे पहाटे चार वाजताच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. पहाटे-पहाटे त्यांनी एपीएमसीमधील भाजी आणि फळ मार्केटचा दौरा केला. यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला.

रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

(Rohit Pawar visits Navi Mumbai APMC Market at 4am)

अजित पवारांनीही सप्टेंबर महिन्यात पहाटे सहा वाजता पुणे मेट्रो स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. तर गेल्या वर्षी भल्या थंडीतही दिंडोरीतील शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते पहाटे पोहोचले आणि हास्याची कारंजी फुलवली.

रोहित पवारांची स्वच्छता मोहीम

कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार हिरीरीने मैदानात उतरले आहेत. जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलच्या आवारातील कचरा दोनच दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या नेतृत्वात साफ करण्यात आला.

जामखेडच्या ‘आरोळे हॉस्पिटल’ने कोरोना काळात मोठं योगदान दिलं. रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत रोहित पवारांसोबत जामखेडवासी स्वच्छता मोहिमेत उतरले. ‘स्वच्छ सर्वेक्षणा’अंतर्गत या हॉस्पिटलमध्ये नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या :

अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

जामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो, थुकरटवाडीत पंकजांचा टोला

(Rohit Pawar visits Navi Mumbai APMC Market at 4am)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.