Fact Check : काय सांगता? Kisan Credit Card वर आकारले जाणार नाही व्याज..! सरकारची बाजू समजून घ्या अन् गैरसमज दूर करा

| Updated on: Apr 06, 2022 | 2:47 PM

सोशल मिडियाचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी केला जातो त्याच तुलनेत अफवा पसरवण्यासाठीही होतो. गेल्या काही दिवसांमध्ये या माध्यमातून अफवा पसरवून सर्वसामान्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण केले जात आहे. एखाद्या घटनेबद्दल ठिक आहे पण आता शासकीय योजनांमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर असा दावा केला जात आहे की, 1 एप्रिल 2022 पासून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

Fact Check : काय सांगता? Kisan Credit Card वर आकारले जाणार नाही व्याज..! सरकारची बाजू समजून घ्या अन् गैरसमज दूर करा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us on

मुंबई : (Social Media) सोशल मिडियाचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी केला जातो त्याच तुलनेत अफवा पसरवण्यासाठीही होतो. गेल्या काही दिवसांमध्ये या माध्यमातून अफवा पसरवून सर्वसामान्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण केले जात आहे. एखाद्या घटनेबद्दल ठिक आहे पण आता शासकीय योजनांमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर असा दावा केला जात आहे की, 1 एप्रिल 2022 पासून (Kisan Credit Card) किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या (Interest on loans) कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. एवढेच नाही तर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारच्या या योजनेतील केसीसी वर व्याज हे शून्य टक्के असल्याचा सांगण्यात आले आहे. मात्र, असा कोणताही निर्णय केंद्राने घेतला नसल्याचे स्पष्टीकरण भारत सरकारच्या प्रेस एजन्सी इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून द्यावे लागले आहे. एवढेच नाही या सोशल मिडियावरील मेसेजची सत्यता सर्वासमोर आणण्यात आली आहे. व्याजमु्क्त कर्ज हे बनावट आहे. या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेतले तर व्याज हे अदा करावेच लागणार असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सरकारचे काय आहे आवाहन?

सोशल मिडियावरील व्हायरल मेसेजबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पीआयबी ने याबाबत माहिती घेतली असून फॅक्ट चेक केले आहे. त्यामुळे योजनांच्या चुकीच्या माहितीचे सरकार केव्हाही समर्थन करणार नाही. याबाबत कुणाला अडचण असल्यास 918799711259 मोबाइल नंबरवर पाठवू शकता किंवा socialmedia@pib.gov.in इमेल आयडीवर पाठवून अचूक माहिती घेता येणार आहे.

कसे आहे केसीसी कर्जाची नियामावली?

शेतकऱ्यांना शेती व्यवसायात लागलीच या कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळवता येते. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज हे घेता येते. यावर 9 टक्के असा व्याजदर ठरविण्यात आला आहे. तर सरकार यावर 2 टक्केची सूट देते. एवढेच नाही शेतकऱ्यांनी जर वेळेपूर्वीच व्याज अदा केले तर नियमित कर्ज अदा करणाऱ्याला 3 टक्के अशी मिळून 5 टक्केची सवलत शेतकऱ्यांना घेता येते. तर 4 टक्के व्याज हे अदाच करावे लागते. देशभरात 2 कोटी 92 लाख शेतकऱ्यांना हे कार्ड देण्यात आले आहे.

मेसेज बद्दल काय आहे स्पष्टीकरण?

1 एप्रिल 2022 पासून किसान क्रेडिट कार्डवर व्याज मिळणार नाही, असा दावा एका वृत्तपत्राच्या कात्रणाद्वारे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केसीसीवर तीन लाख रुपयांपर्यंत मोफत पैसे मिळणार आहेत. आता शेतकऱ्यांना 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे केंद्र सरकारवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. या मेसेजच्या दाव्यावर सरकारने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. केसीसी अंतर्गत व्याजमुक्त कर्ज हा मेसेज चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

असे बनवायचे किसान क्रेडिट कार्ड

Step 1: किसान कार्ड मिळवायचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम शेतकऱ्यांना किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग येथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड कारावा लागणार आहे.

Step 2: हा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना तो कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या मदतीने तो भरुन जवळच्या बँकेत सबमिट करावा लागणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी लागणार आहे. यानंतर, तुम्हाला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाते. तथापि, तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊन देखील फॉर्म मिळवू शकता.

संबंधित बातम्या :

Latur : पाटबंधारे विभागाचा असा ‘हा’ निर्णय, भर उन्हाळ्यातही लातुरातील शेतकरी सुखावला

अतिरिक्त उसाची माहिती द्या, तरच होणार तोडीचे नियोजन, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसाठी विशेष मोहिम..!

द्राक्ष बागा आता जोमात वाढणार, वातावरण बदलाची फरक नाही पडणार, State Government चा काय आहे मेगा प्लॅन?