मुंबईकरांनी मिळणार पनवेलची स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरला जाण्याची चिंता मिटली

सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून यशस्वी लागवड केली. Strawberry Farming at Panvel

मुंबईकरांनी मिळणार पनवेलची स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरला जाण्याची चिंता मिटली
पनवेलमध्ये स्ट्रॉबेरी शेती
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:21 PM

नवी मुंबई: स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आठवतं. राज्यातील प्रगतीशील शेतकरी वेगवेगळ्या भागात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करत आहेत. पनवेलमध्ये महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाबळेश्वर येथून रोप आणून पनवेल येथील शेतीत हा प्रयोग करण्यात आला होता. तर महाबळेश्वरची स्ट्राबेरी शेती पनवेल मध्ये यशस्वीरीत्या करण्यात आल्याने परिसरातील लोकांना नवल वाटत आहे. अति थंडी असणाऱ्या वातावरणातच स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हे समीकरण पनवेल येथील सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी बदलले आहे. पवार यांच्या प्रयोगशीलतेचे प्रांताधिकारी दत्ता नवले यांनी कौतुक केले आहे (Sajjan Pawar and Prashant Pawar sucessfully did strawberry farming at Panvel)

महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं मागवली

सज्ज पवार आणि प्रशांत पवार त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून लागवड केली. पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीला आवश्यक हवामान नसतानादेखील पवार यांनी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. स्ट्रॉबेरीच्या झाडांची निगा राखल्यानं केवळ दिड महिन्यात त्यांना उत्पादन चालू झाले आहे. हिवाळ्यातील थंडीच्या कालावधीचा अभ्यास करुन योग्य लागवड केल्यास पनवेल सारख्या भागात स्ट्रॉबेरीची लागवड करता येऊ शकते, पवार यांच्या यशस्वी प्रयोगावरुन दिसून येते.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोपांची लागवड

पवार बंधूनी थंडी सुरु होताच महाबळेश्वर येथून रोप आणण्यात आले होते. जानेवारी महिन्यात लावण्यात आलेल्या झाडाला दिडच महिन्यात 50 ते 100 ग्रॅमचे 8 ते 10 फळे आली आहेत. लाल भडक रंग, मोठा आकार व चवीला गोड असलेले फळ आणि जवळपास 200 ते 250 रुपये किलोला विकलं जातेय. त्यामुळे या प्रयोगासाठी केलेल्या कष्टाचे चिज झाल्याचे समाधान पवार कुटुंबियांना आहे.

सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर आणि कृषी प्रदर्शनात स्ट्राबेरी शेती पिकाची माहिती घेतल्यानंतर हा प्रयोग करण्याचे ठरवले. परंतु, फक्त माहिती न घेता खऱ्या अर्थाने हा वेगळा प्रयोग शेतकऱ्याने सत्यात उतरवला आहे. शिवाय कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेती केल्याने हा प्रयोग आदर्शवत मानला जात आहे. हा प्रयोगशील प्रयत्न पाहून पनवेल प्रांत अधिकारी दत्ता नवले यांनी पवार बंधूंचे कौतुक केले आहे. तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून याबाबत इतर शेतकऱ्यांना मागर्दर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!

एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद फक्त शेतीत, मंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉबेरीच्या शेतात

(Sajjan Pawar and Prashant Pawar successfully did strawberry farming at Panvel)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.