Cotton Seed : कृषी विभाग निर्णयावर ठाम, हंगामापूर्वीच वाढणार का बियाणे विक्रीचा काळाबाजार?
बी.टी कापूस बियाणे त्वरीत बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्याची मागणी सियाम या संघटनेने केली आहे. यंदा राज्यात कापसाचा पेरा वाढणार आहे. बागायती भागात काहीही झाले तरी शेतकरी लवकरच कापसाची लागवड करतात. जर वेळेवर कापूस बियाणे मिळाले नाहीतर इतर मार्गाने बियाणे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता आहे. शिवाय उशिरा लागवड झाल्यानेही बोंडअळीचा प्रादुर्भाव होणारच आहे.
पुणे : हंगामाच्या अगोदरच कपाशीच्या (Cotton Seed) बी.टी बियाणाची विक्री झाली तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हंगाम सुरु झाल्यावरच बियाणांच्या विक्री करण्याचा निर्णय (Agricultural Department) कृषी विभागाने घेतला आहे. यासंदर्भात बियाणे उद्योजकांनी आवाज उठवल्यानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, कृषी विभागाच्या या धोरणामुळे मागच्या दारून बियाणे बाजारात येतील (Bogus Seed) आणि काळाबाजार वाढेल अशी शंका उपस्थित केली आहे तर दुसरीकडे हंगामाच्यापूर्वीच कपाशीची लागवड झाली तर पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यास निर्माण झालेल्या परस्थितीला जबाबदर कोण असे म्हणत कृषी विभाग आपल्या निर्णयावर ठाम आहे. कृषी विभागाने निर्णयात बदल केला तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असे आहे कपाशी बियाणांचे नियोजन
हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.
बियाणे उद्योगाने केली भीती व्यक्त
बी.टी कापूस बियाणे त्वरीत बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्याची मागणी सियाम या संघटनेने केली आहे. यंदा राज्यात कापसाचा पेरा वाढणार आहे. बागायती भागात काहीही झाले तरी शेतकरी लवकरच कापसाची लागवड करतात. जर वेळेवर कापूस बियाणे मिळाले नाहीतर इतर मार्गाने बियाणे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता आहे. शिवाय उशिरा लागवड झाल्यानेही बोंडअळीचा प्रादुर्भाव होणारच आहे. त्यामुळे बियाणे विक्रीला लवकर परवानगी दिली तर शेतकऱ्यांचा प्रश्न तरी मार्गी लागेल असे मत या संघटनेने व्यक्त केले आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतजमिनीचेही नुकसान
कापूस बियाणांची विक्री लवकर झाली तर लागवडही लवकरच होणार आहे. हे विक्रेत्यांसाठी सोईचे असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र नुकसानीचे आहे. कापसाची लागवड लवकर झाली तर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो हे यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्यामुळे लवकर बियाणे उपलब्ध करुन होणाऱ्या नुकासनीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करीत कृषी विभाग आपल्या निर्णयावर ठाम आहे.