शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?

आतापर्यंत सोयाबीनची विक्री की साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचा निर्णय हा ठाम होता. पण गेल्या काही दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे नेमकी काय करावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कारण बाजारपेठेतले दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि दरात घट झाली की, पुन्हा साठवणूक हे ठरलेले गणित होते.

शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 1:47 PM

लातूर : आतापर्यंत सोयाबीनची विक्री की साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचा निर्णय हा ठाम होता. पण गेल्या काही दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे नेमकी काय करावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कारण बाजारपेठेतले दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि दरात घट झाली की, पुन्हा साठवणूक हे ठरलेले गणित होते. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता दरात होणारे बदल आणि भविष्यात पुन्हा (Summer Season) उन्हाळी सोयाबीनची आवक यामुळे दर काय राहतील याबाबत संभ्रमता निर्माण होत आहे. त्यामुळेच सध्या दरात घसरण झाली असली तरी आवक मात्र टिकून आहे. आतापर्यंत दर घसरले की लागलीच त्याचा आवकवर परिणाम होत होता पण गेल्या आठ दिवसांपासून 6 हजार 200 रुपयांवर सोयाबीन स्थिरावले असताना (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 हजार पोत्यांची आवक ही सुरुच आहे.

शेतकऱ्यांच्या मनात नेमकी काय भीती?

आतापर्यंत सोयाबीनचे दर टिकून ठेवण्यामध्ये शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. बाजारपेठेचे गणित त्यांच्या लक्षात आले होते. उत्पादनात अतिरिक्त पावसामुळे घट ही झालीच होती. त्यामुळे हंगामात केव्हा ना केव्हा वाढीव दर मिळतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना होतीच. त्यामुळे घटलेले दर असताना शेतकऱ्यांनी केव्हाच विक्री केली नाही. शिवाय सरासरीचा दर असतानाही एकदम आवक न वाढवता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली होती. त्यामुळेच दिवाळीपर्यंत 4 हजार 800 रुपयांवर असलेले सोयाबीन दिवाळीनंतर थेट 6 हजार 600 येऊन ठेपले होते. आता पुन्हा त्यामध्ये घसरण झाली असून गेल्या 15 दिवसांपासून 6 हजार 200 वर स्थिरावले आहे. पण भविष्यात उन्हाळी हंगामातील सोयाबानची आवक सुरु होईल आणि त्याचा दरावर परिणाम होणार यामुळे साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

काय आहे तज्ञांचा सल्ला ?

सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेला सावध पवित्रा हा महत्वाचा ठरलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत बदल होत आहे. सोयापेंडच्या दरात घट झाली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उठाव नाही. असे असले तरी शेतकऱ्यांनी अधिकच्या दराची अपेक्षा न करता सध्याही टप्प्याटप्प्याने विक्री करणेच फायद्याचे राहणार आहे. सध्या दर जरी सामान्य असले तरी पूर्णच सोयाबीनची साठवणूक करु नये असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेत काय झाला बदल?

Nashik : तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं, द्राक्ष उत्पादकांची बाजू समजून घ्या..! बागायतदार संघाचा निर्णय टिकणार का मोडीत निघणार..!

सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.