Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट

चंदनाची शेती कमी प्रमाणात केली जाते. पण त्याची शेती केली तर 1 एकरात काही कोटींची हमी आहे. (sandalwood farming Cultivation maharashtra plantation)

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट
चंदनशेती
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 12:26 PM

मुंबई : चंदनाची शेती (sandalwood farming) कमी प्रमाणात केली जाते. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी चंदनाची झाडं येतात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही काही ठिकाणी ते दिसतात. पण त्याची शेती केली तर 1 एकरात काही कोटींची हमी आहे. (sandalwood farming Cultivation in maharashtra all about to know plantation price return income)

एक चंदनाचं झाड काही लाखात

चंदनाचं(Sandalwood) झाड खूप महागडं असतं हे कदाचित तुम्हाला माहिती आहे. याचा वापर होम हवन, पुजेत करतात. पण चंदनाची शेती केली जाते हे फार कमी जणांना माहिती असेल. कारण देशातल्या फार कमी भागात चंदनाची शेती केली जाते. तुम्ही एक झाड जरी चंदनाचं लावलं तर कमीत कमी त्याची किंमत 5 लाख रुपये एवढी आहे. याचाच अर्थ तुम्ही जेवढ्या जास्त जमीनीवर चंदन लावाल तेवढी कमाई जास्त.

चंदनाची शेती आता कुठे केली जातेय?

हरयाणात घरोंडा नावाचं गाव आहे. तिथं एक शेतकरी चंदनाची शेती करतो. त्यांनी काही एकरावर चंदनाची झाडं लावलेली आहेत आणि ते आता चांगले वाढताना दिसतायत. चंदनाचं रोपटं लावलं तर त्याचं झाड व्हायला 12 वर्षे लागतात. एक जर रोप लावलं तर पाच ते सहा लाख रुपयांची कमाई निश्चित आहे. घरोंड्याच्या शेतकऱ्यानं तर एका एकरात 600 चंदनाची रोपटी लावलीत. त्याला आता तीन वर्ष झालीत. म्हणजे आणखी 9 वर्षानं त्यांना 30 कोटी रुपयांची कमाई होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आपल्याकडे महाराष्ट्रातही विदर्भातल्या (Vidharbha) काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी चंदनाच्या शेतीचा प्रयोग केलेला आहे.

चंदनाच्या रोपट्याची किंमत किती?

चंदनाचं रोपटं खूप महाग मिळतं. म्हणजे त्याची जशी कमाई आहे तशीच त्याच्या रोपट्याची किंमत आहे. एका रोपासाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. महाराष्ट्रात गेल्या काही काळात याचं बियाणं मिळतं. सरकारनेही चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. चंदनाची शेती आंध्र, (Andhra) कर्नाटकमध्ये(Karnatak) मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात बियाणेही पूर्वी कर्नाटकातून यायचं आता मात्र ते महाराष्ट्रातही उपलब्ध होतं.

चंदनाची लागवड कशी होते?

चंदनाला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे कारण तो सर्वच बाबतीत दुर्मिळ आहे. म्हणजे शंभर बिया पेरल्या तर त्यातल्या दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त 20 टक्के येतात. एखाद्या किलो बियाण्यांपासून दोनशे ते अडीचशे रोपं तयार होतात. जून महिना लागवडीसाठी योग्य आहे. पेरलेलं उगवायला जवळपास दोन महिने लागतात. उगवल्यानंतर पंधरा दिवसानंतर पिशवीत ठेवलं जातं. दोन वर्षे चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पण दोन वर्षात पिशवी काही वेळा बदलली जाते. पाच ते सहा वर्षात झाडाची उंची बारा ते पंधरा फूट एवढी अपेक्षीत आहे. ज्या खड्यात चंदन लावलेलं आहे तो माती आणि शेणखतानं भरलेला असतो. विशेष म्हणजे चंदन सर्व प्रकारच्या मातीत उगवतं. तग धरतं.

चंदनाला कशापासून धोका?

चंदनाच्या झाडावर साप असतात अशी धारणा खुप काळापासून आहे पण त्यात तथ्य नाही. चंदनाची चोरी करु नये म्हणून ही धारण पसरवली गेली आहे. चंदनाला खरा धोका आहे तो पाण्यापासून. त्याला फार जास्त पाणी चालत नाही. खोलगट भागात जिथं पाणी साचतं तिथं चंदनाची लागवड करु नका. जास्त पाण्यात त्याचं झाड सडण्याची शक्यता जास्त आहे.

चंदन शेतीवर सरकारचं धोरण?

चंदनाची शेती कुणीही करु शकतं पण त्याची निर्यात मात्र शेतकरी करु शकत नाही. कुठल्या कंपन्यांनाही त्याची निर्यातबंदी आहे. याचाच अर्थ फक्त सरकारच चंदनाची निर्यात करु शकते. चंदनाचं झाड तयार झालं की वनविभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यानंतरच निर्यातीचं काम केलं जातं. चंदन जगातलं सर्वात महागडं झाड आहे. सध्या प्रती किलो 27 हजार रुपये त्याची किंमत आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचं लाकुड मिळतं, ज्याची किंमत 5 ते 6 लाख रुपये एवढी आहे. सुगंधी तेलापासून ते आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. म्हणूनच त्याला जास्त किंमत आहे.

वेगानं वाढतो चंदन

अडीच वर्षाच्या चंदनाच्या रोपट्याला लावणं उपयोगाचं मानलं जातं. तोपर्यंत तो दोन ते अडीच फूट वाढलेला असतो. थंडीच्या दिवसात चंदनाची लागवड करु नये. आठवड्यातून त्याला दोन ते तीन लीटर फक्त पाणी लागतं. पाणी जेवढं नियंत्रीत ठेवाल तेवढं त्याला फायदेशीर. काही जण चंदनाला परजीवी मानतात त्यामुळे सोबत कुठलं तरी पिक घेण्याचा सल्ला दिला जातो. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार चंदन अर्धपरजीवी आहे. त्यामुळे तज्ञांचा सल्ला यात उपयुक्त ठरेन.

चंदनाबद्दलच्या अफवा

चंदनाच्या झाडावर साप असतात ते खोटं आहे. चंदनाची चोरी केली जाते, तस्करीही होते ही गोष्ट खरी. पण आठ वर्षापर्यंत तेही होत नाही कारण आठ वर्ष पूर्ण केलेल्या झाडालाच सुगंध असतो. त्यामुळे चंदनाच्या झाडाला तशी आठ वर्षापर्यंत किंमत नाही. त्यानंतर मात्र बारा ते पंधरा वर्षापर्यंत त्याची राखण करावी लागते.

चंदनाची मिश्र शेती?

चंदनाच्या शेतीत इतर पिकही घेता येतात. चंदनाच्या दोन झाडात 20 फुटाचं अंतर ठेवावं आणि मग त्यात इतर पिकं घेता येतात. फक्त ऊस किंवा तांदुळ त्यात लावता येत नाही. कारण ह्या दोन्ही पिकांना पाणी भरपूर लागतं आणि चंदनाच्या झाडाला पाण्याचाच धोका जास्त आहे.

लाल आणि पांढरं चंदन

चंदनाचं झाड हळूहळू पकतं. याचाच अर्थ चंदन जसाही वयात येतो तसा त्यात सुंगध भरतो. सुंगध येतोय म्हणजे त्याचं वजनही वाढतय. चंदनाचं झाड जेवढा काळ ठेवाल त्यानुसार त्याचं वजन भरतं. दोन प्रकारची चंदनाची झाडं आहेत. एक लाल चंदन आणि दुसरं पांढरं चंदन. आपल्याकडे पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. कारण आपल्याकडची जमीन त्यासाठी अनुकूल आहे. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. 5 ते 47 डिग्री तापमानात चंदन व्यवस्थित येतो.

इतर बातम्या :

MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड

आता रासायनिक खताला हिरव्या खताचा पर्याय, जाणून घ्या कसे तयार करायचे?

(sandalwood farming Cultivation in maharashtra all about to know plantation price return income)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.