Video | डाळिंब लागवडीचा आटपाडी पॅटर्न, रोहयो’तून 434 हेक्टरवर लागवडीचे प्रस्ताव मंजूर

545 शेतकऱ्यांच्या 434.50 हेक्टर क्षेत्राला रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवड करण्यास मंजुरी दिली आहे. Aatpadi farmers pomegranate proposal

Video | डाळिंब लागवडीचा आटपाडी पॅटर्न, रोहयो'तून 434 हेक्टरवर लागवडीचे प्रस्ताव मंजूर
सांगली डाळिंब लागवड
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 10:39 AM

सांगली: जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात कृषी विभागाने चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून (रोहयो) विक्रमी 545 शेतकऱ्यांना 434 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गेल्या 15 वर्षांतील विक्रमी मंजुरी आणि लागवड ठरली. आटपाडी तालुका डाळिंब उत्पादन घेण्यात राज्यात आघाडीवर आहे. तालुक्यातून युरोपियन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात वाढू लागली. टेंभूचे पाणी आल्याने फळबागा लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे. (Sangli Aatpadi 545 farmers pomegranate proposal approved by agriculture department )

दुष्काळी भागासाठी डाळिंब वरदान

दुष्काळी भागातील नगदी पिक म्हणजे डाळिंब होय. कमी पाण्यावर आणि येथील हवामानावर चांगल्या प्रकारे डाळिंब तयार होत. डाळिंब हे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. या दुष्काळी भागात निर्यात दर्जाची डाळिंब तयार होतात.आटपाडी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात नेहमी या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, येथील शेतकरी कष्टाळू असून त्यांनी जिद्दीने डाळिंब पीक घेत आहेत. टेंभूचे पाणी आल्याने डाळींब फळबागा लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे, असं डाळिंब उत्पादक शेतकरी दादासाहेब सूर्यवंशी सांगतात.

आटपाडी तालुक्यात 15 हजार हेक्टरवर डाळिंबांचं क्षेत्र

आटपाडी तालुक्यात सध्या 15 हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. दरवर्षी नवीन लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी आटपाडी तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून दाखल झालेल्या डाळीब लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद केले होते. गेल्यावर्षी जेमतेम बारा हेक्टर क्षेत्राला मंजुरी दिली होती. 2020 ते 21 मध्ये तालुक्यातून जवळपास 550 शेतकऱ्यांनी नवीन डाळिंब लागवडीचे प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले होते. यातील विक्रमी 545 शेतकऱ्यांच्या 434.50 हेक्टर क्षेत्राला रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवड करण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजुरी गेल्या 15 वर्षांतील उच्चांकी ठरली आहे. यातील 254 शेतकऱ्यांनी 191 हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत लागवड पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची पूर्वतयारी सुरू आहे, अशी माहिती बसवराज मासतोले कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी विभाग, सांगली यांनी दिली आहे.

पांडुरंग फुंडकर योजनेतील प्रस्ताव रखडले

पांडुरंग फुंडकर योजनेतून डाळिंब लागवडीची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. मात्र, त्याला वर्षभरापासून मंजुरी शासनाकडून मिळाली नसल्याने रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नाही. पांडुरंग फुंडकर योजनेतून ही मंजुरी थांबल्यामुळे ते शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ती अट रद्द करून त्यांनाही रोजगार हमी योजनेतून मंजुरी मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

संबंधित बातम्या:

शरद पवारांनाही भावलेलं डाळिंब उत्पादनातील अग्रेसर गाव!, खानजोडवाडीतील शेतकऱ्यांची यशोगाथा

ऊस लावणार आणि बिल येईपर्यंत कट्ट्यावर बसणार, कसं चालेल?, पवारांचा गावपुढाऱ्यांना टोला

(Sangli Aatpadi 545 farmers pomegranate proposal approved by agriculture department )

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.