एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते.
सांगली : सांगलीत एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सांगलीतील जत तालुक्यातील अंतराळ गावातील एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. काकासाहेब सावंत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना यात चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. (Sangli Farmer experiment successful of producing 22 varieties of mangoes on a single tree)
पुण्यातील नोकरी सोडून गाव गाठले
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग. याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले. त्यानंतर शेती सुरू केली. काही दिवसांनी त्यांनी शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली. या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली.
काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते. हे काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला. यात त्यांनी 22 प्रकारच्या आंब्याची लागवड केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयोगात हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.
शेतीची दोन गटात विभागणी
सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. यात केशर या आंब्याची जातीची लागवड जवळपास 10 एकरांत केली आहे. तर उर्वरित 10 एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सब्सिडीचा लाभ घेत ही नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी यश मिळवले आहे.
यंदा 4 लाख रोपांची ऑर्डर
यानंतर आता जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. काकासाहेब दरवर्षी आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळपास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड,।उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव।इत्यादी परिसरांतून लोक येतात.
यावर्षी त्यांना आश्चर्यकारकरित्या 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू करा. त्यातून मोठे यश कमावता येते, यामुळे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.
पाहा व्हिडीओ :
Monsoon Skin Diet : पावसाळ्यात हेल्दी त्वचेसाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा https://t.co/XT8Yix495U #Mosoon #Skin #Diet
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2021
(Sangli Farmer experiment successful of producing 22 varieties of mangoes on a single tree)
संबंधित बातम्या :
मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा
TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात