सांगलीत मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत, रत्नागिरीच्या हापूस पेटीला मिळाले….
सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये मुहूर्ताच्या आंब्याचे आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. (Sangli Hapus Mango box )
सांगली: येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत करण्यात आले. 4 डझन हापूस आंब्याला 8 हजार रुपये दर मिळाला आहे. आंबा हा फळ फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. सांगलीत या वर्षीच्या मुहूर्ताच्या आंब्याची आवक झाली आहे. विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये मुहूर्ताच्या आंब्यावर बोली लावण्यात आली.(Sangli Hapus Mango box got eight thousand rupees prize)
रत्नागिरी हापूस आंब्याचे शेतकरी मंगेश कालकर यांनी सांगलीच्या मार्केट मध्ये 3 पेटी आंबे सांगलीच्या बाजारात आणले होते. दोन प्रकारचे हापूस बाजारात आणले होते. त्यापैकी 4 डझन आंब्यास 8 हजार दर तर 5 डझन आंब्यास 7 हजार असा दर आलेला आहे. या मुहूर्तावरच्या आंब्याची सौदा जयसिंगपूर येथील प्रतिष्ठित व्यापारी शामराव खुराडे यांनी घेतला आहे. नव्याने मुहूर्ताच्या आंब्याचे सौदे झाल्याने विक्रेत्यांच्यावतीने आंब्याचे आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.
दिपावलीमध्ये सांगलीत दक्षिण आफ्रिकेतून आंबे दाखल
दीपावली आणि पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली शहरातील फळ बाजारात थेट दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल झाला आहे. या आफ्रिकन आंब्यांचा दर प्रति दोन डझनांमागे 2 हजार ते 2200 रुपये एवढा होता. ऐन सणासुदीच्या काळात हा आंबा सांगलीत दाखल झाल्याने त्याची चव चाखण्यासाठी नागरिक फळ बाजारात गर्दी करू लागले होते. दरवर्षी दिवाळी आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जातीचे, अनोखी चव असणारे आंबे सांगलीच्या बाजारामध्ये दाखल होतात.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या आंब्यांना सांगलीकरांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. नागरिक या आंब्यांची चव चाखण्यासाठी दुकानासमोर गर्दी करत असल्याचं दिसून आलं होतं. विशेष म्हणजे आफ्रिकन आंबा मागील तीन वर्षांपासून सांगलीच्या फळ बाजारात येत आहे. या आंब्याची चव रत्नागिरीच्या आंब्यासारखी असल्यामुळे ग्राहकांकडून आफ्रिकन आंब्यांना चांगली मागणी असल्याचे विष्णू अण्णा फळ बाजारामधील व्यापाऱ्यांनी सांगितले होतं.
सांगलीत दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल, दर तब्बल……https://t.co/dQSplrUjli#sangali #MANGO #mango #mahashtramango
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
संबंधित बातम्या:
सांगलीत दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल, दर तब्बल……
सर्वसामान्यांसाठी ‘गोड’ बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर
(Sangli Hapus Mango box got eight thousand rupees prize)