बिस्लेरीच्या उलट्या बाटलीत सरळ वांग आलं, शेतीचा अनोखा प्रयोग पाहायला लोकांची गर्दी
पणुंब्रे गावातील शेळके कुटुंबात ही झाडं पाहायला मिळतात. मुळात त्यांचा पूर्वीपासून मासे विक्रीचा पारंपारिक व्यवसाय आहे. ते वारणा नदी आणि परिसरात असलेल्या तलावात मासेमारी करतात.
सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यात शेतीचा एक अनोखा प्रयोग पाहायला मिळाला आहे. बिस्लेरीच्या बॉटलमध्ये त्यांनी शेती केली आहे. तुम्ही हे ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु बिस्लेरीच्या बॉटलमध्ये आलेल्या वांग्याची स्टोरी (farmer story) वेगळीचं आहे. शिराळा तालुक्यातील पणुंब्रे गावात एका ठिकाणी बिस्लेरीच्या बाटलीत वांगी पाहायला मिळत आहेत. त्या परिसरात गेल्यानंतर वांग्याची झाडं अनेकांचं लक्ष खेचत आहेत. त्यांनी बाटलीत शेती करण्याचं कारण वेगळं आहे. बाटलीत त्यांनी टॅमोटो आणि मिरचीची सुध्दा झाडं लावली आहेत. त्या घरातील तरुण माशांची विक्री करुन घरं चालवतात.
पणुंब्रे गावातील शेळके कुटुंबात ही झाडं पाहायला मिळतात. मुळात त्यांचा पूर्वीपासून मासे विक्रीचा पारंपारिक व्यवसाय आहे. ते वारणा नदी आणि परिसरात असलेल्या तलावात मासेमारी करतात. त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या घराच्या व्यतिरिक्त अजिबात जमीन नाही. त्याचबरोबर शेती करण्यात आवडं असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं शेती केली असल्याचं सांगितलं आहे.
शेळके कुटुंबातील आज्जींनी सांगितलं की, ज्यावेळी आमचा मुलगा मुंबईत होता. त्यावेळी तो तिकडं नोकरी करीत होता. त्यावेळी त्याने हा प्रयोग मुंबईत पाहिला होता. त्याचबरोबर मुंबईत राहत असलेल्या ठिकाणी सुध्दा त्याने हा प्रयोग केला होता. तो मागच्या चार वर्षांपुर्वी गावी आला, आजारी असल्यामुळे तो आता इथेचं राहायला लागला. त्यावेळी त्याने हा प्रयोग इथं केला आहे.
बिस्लेरीच्या बाटली सुरुवातीला आपल्याला पाहिजे तशी कापून घेतली. त्यानंतर ती अडवण्यासाठी तार बांधली. त्यानंतर त्यामध्ये माती भरली, शेण खतं वापरलं. वांग्याची आणलेली रोपं विरुद्ध दिशेने लावली. वांग्याचं झाडं वाढतं होतं, तशी आम्ही त्याची काळजी घेत होतो. काही दिवसांनी वांग्याच्या झाडाला फुलं आली. त्यानंतर वांगी लागली अशी माहिती संतोष शेळके या तरुणाने दिली.
उलट्या बाटलीत वांग्याची रोपं वाढत असल्यामुळं आम्ही आणखी झाडं वाढवली, त्याचबरोबर मिरच्यांची झाडं आणि टॅमोटोची झाडं सुध्दा लावली. त्या सुध्दा झाडांना टॅमोटो आणि मिरच्या आल्या आहेत.