सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं धुराडं तब्बल 13 वर्षानंतर पेटणार, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

थकबाकी वुसलीसाठी राज्य सहकारी बॅंकेने हा साखर कारखाना ताब्यात घेतला होता. राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्यण घेतला आहे.

सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं धुराडं तब्बल 13 वर्षानंतर पेटणार, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
साखर कारखान्याचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 3:50 PM

सोलापूर: सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना तब्बल 13 वर्षानंतर पुन्हा सुरु होणार आहे. थकीत कर्जाच्या वसुली साठी राज्य सहकारी बॅंकेने ताब्यात घेतलेला हा कारखाना उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या धाराशिव साखर उद्योग समुहाला 25 वर्षाच्या मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव साखर उद्योग समुहाने कारखाना ताब्यात घेतला असून गाळप हंगाम सुरु करण्याच्या दृष्टाने तयारी सुरु केली आहे. तब्बल 13 वर्षानंतर कारखाना सुरु होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कारखाना विक्री न करता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय

थकबाकी वुसलीसाठी राज्य सहकारी बॅंकेने हा साखर कारखाना ताब्यात घेतला होता. राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्यण घेतला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बॅंकेने राज्यातील डबघाईला आलेले 13 साखर कारखान्यांची निविदा काढून ते भाडेत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचा पहिला साखर कारखाना राज्य सहकारी बॅंकेने भाडेत्त्त्वार दिला आहे. हा कारखाना अभिजीत पाटील चालवणार असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

15 ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु

राज्यात 2021-22 साठी उसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. जे कारखाने 15 ऑक्टोबर 2021 पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत असा निर्णय ही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला. केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी सारख आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने आपला अहवाल आज शासनास सादर केला असून त्यावर सहकार विभागाने हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी असेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत  आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी उस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे, यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

राज्यातील 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर  ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.  बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले.

इतर बातम्या:

शेतामध्येच टोमॅटोचा ‘लाल चिखल’, भाजीपाला कवडीमोल दरात

ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांवर सक्ती नको, बच्चू कडूंकडून अडचणींचा पाढा, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Sangola Shetkari Sahkari Sakhar Karkhana started after 13 years Abjijeet Patil take sugar mill on 25 years lease

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.