ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा

ईडीची नोटीस मिळाल्यानंतर साताऱ्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटिशीसंदर्भात खुलासा केला आहे.

ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं?  सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 5:10 PM

सातारा: अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं जरंडेश्वरला दिलेल्या कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर साताऱ्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटिशीसंदर्भात खुलासा केला आहे. ईडीच्या नोटीस संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे. (Satara District Central Co-Operative Bank Ltd gave explanation about ED notice and Loan of Jarandeshwar )

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेनं काय साांगितलं?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची नोटीस आली असून कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले याबाबतचा खुलासा ईडीच्या नोटीस मध्ये मागवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी या नोटीस बाबत खुलासा केला आहे.

बँकेनं जरंडेश्वरला किती कर्ज दिलं?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2017 पासून जरंडेश्वर कारखान्यासाठी 128 कोटीचे कर्ज वितरीत केले आहे. कारखान्याकडे सध्या 97 कोटी 37 लाख कर्ज शिल्लक आहे जरंडेश्वर शुगर कडून वेळेत कर्ज फेडले जात आहे का? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे याविषयीची माहिती ईडी कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र सरकाळे यांनी दिली.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

राजेंद्र सरकाळे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे.

जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर

सध्या जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सातारा जिल्हा बँकेला द्यावी लागणार आहेत.

इतर बातम्या

जरंडेश्वरच्या कर्ज प्रकरणाची चौकशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस

जरंडेश्वर प्रकरण A टू Z, अजित पवार ED च्या रडारवर का आहेत? सोपं कारण

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय? 

(Satara District Central Co-Operative Bank Ltd gave explanation about ED notice and Loan of Jarandeshwar )

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.