कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?
कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 29 जूनला मतदान होणार आहे. कृष्णाकाठावरील राजकारण निवडणुकीमुळं रंगू लागलं आहे. Krishna Sugar Mill Karad election
सातारा: कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकी साठी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले ,डॉ.अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही सभासदांच्या अपेक्षांची केलेली पूर्तता हाच निवडणुकीचा मुद्दा असल्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. सत्ताधारी गटासमोर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेल आणि इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वातील रयत पॅनेलचं आव्हान आहे. (Satara Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Karad election last two days for filing applications)
सभासदांच्या अपेक्षा पूर्ण केल्या
मागील निवडणुकीत ज्या अपेक्षेने सभासदांनी आम्हाला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यात आल्या आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाने आश्वासनं पूर्ण केली असून हाच मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली. कृष्णा कारखान्यांचा कारभार चांगला चालला असल्याने विरोधकांकडे निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याने विरोधक गोंधळले असल्याची टीका डॉ अतुल भोसले यांनी केली आहे.
अर्ज भरण्यासाठी 1 जूनपर्यंत मुदत
कृष्णा कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या 1 जून हा अंतिम दिवस आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा सांगली जिल्ह्यात कार्य क्षेत्र असून 47700 सभासद आहेत. 29 जून रोजी मतदान असून 1जुलै रोजी निवडणुक निकाल आहे. कोरोना काळात न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक होत आहे.
सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल विरोधात एकजूट होणार?
कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या विरोधात डॉ.इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या अनुक्रमे रयत आणि संस्थापक पॅनेलचं आव्हान आहे. सत्ताधाऱ्यांचा पराभाव करण्यासाठी दोन्ही पॅनेल एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांनी शक्य असल्यास एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असा सल्ला त्यांना पक्षातील ज्येष्ठ मंडळींनी दिला आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र
राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.
Break the chain : लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर – ई पास गरजेचा आहे का? जिल्हाअंतर्गत प्रवासाबद्दल काय? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरेhttps://t.co/R7Gocr51rq#maharashtralockdown | #CMUddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार
(Satara Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Karad election last two days for filing applications)