ठरलं, गोकुळकडून दूध खरेदी दरवाढ जाहीर, दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय
गोकुळ दूध संघानं दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हैशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कोल्हापूर : गोकुळ दूध संघानं दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हैशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दूध खरेदी दरवाढ 11 जुलै पासून लागू होणार असल्याचं सांगितलं. दूध खरेदी दर वाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भागात दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ( Satej Patil and Hasan Mushrif declare milk rates hike for gave relief to farmers except Kolhapur milk sale price also increased)
कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील दूध विक्रीचा दर वाढला
कोल्हापूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी दूध विक्री दरात ही दोन रुपायांची वाढ होणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे. जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना 2 म्हैशी पर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो टप्पा लवकरच गाठणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
सध्या दर किती?
गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला आहे 39 रुपये तर गाईच्या दुधासाठी 26 रुपये दर देत आहे.
मुंबईत गोकुळचं दूध महागणार
गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना 11 जुलैपासून म्हैशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्री दरातही 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथं जिथं गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तिथल्या ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत.
गोकुळ निवडणूक
गेल्या महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.
संबंधित बातम्या:
गोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादकांसाठी भेट, हसन मुश्रीफ-सतेज पाटलांचं ‘ठरलंय’!
‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ
Satej Patil and Hasan Mushrif declare milk rates hike for gave relief to farmers except Kolhapur milk sale price also increased