ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?

नवनवीन यंत्राचा वापर वाढलेला आहे शिवाय पाणी बचतीसाठीही वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी पिकांना पाणी हे पाठाद्वारे दिले जात होते. मात्र, यामध्ये अमूलाग्र बदल झाला असून आता स्प्रिंक्लर अन्यथा ठिबकचा वापर वाढलेला आहे. यामुळे केवळ पाण्यातच बचत होतेय असे वाटत होते पण आता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खताचेही व्यवस्थापन केले जात आहे.

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?
ठिबक सिंचन
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:01 AM

लातूर : काळाच्या ओघात जसा (Changes in cropping pattern) पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे अगदी त्याप्रमाणेच शेती करण्याची पध्दतही बदलत आहे. नवनवीन यंत्राचा वापर वाढलेला आहे शिवाय पाणी बचतीसाठीही वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी पिकांना पाणी हे पाठाद्वारे दिले जात होते. मात्र, यामध्ये अमूलाग्र बदल झाला असून आता स्प्रिंक्लर अन्यथा (Use of Drips) ठिबकचा वापर वाढलेला आहे. यामुळे केवळ पाण्यातच बचत होतेय असे वाटत होते पण आता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खताचेही व्यवस्थापन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Benefit to farmers) दुहेरी फायदा होत आहे. पाण्याची बचत आणि योग्य मात्रामध्ये पिकांना खताचा आणि औषध पुरवठा यासारखी कामे अगदी सहजरित्या होऊ लागली आहेत. पाण्यासोबत पाण्यात विरघळणारी घनरूप खते आणि द्रवरुप खते पिकांना देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. ही अत्याधुनिक पध्दत अवलंबण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला असला तरी आता झपाट्याने यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होत आहे.

ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यामुळे होणारे फायदे

– खतांचा कार्यक्षमतेने वापर त्यामुळे खतांच्या मात्रेत बचत होते. – दररोज किंवा खताची एकूण मात्रा विभागून झाडांच्या गरजेनुसार दिल्यामुळे उत्पन्नात भरीव वाढ. – याद्वारे खत दिल्यास सर्व झाडांना समप्रमाणात मिळते. – खते देण्यासाठी लागण्याऱ्या मजुरीच्या खर्चातही बचत होते. – जमिनीवरून वाहून किंवा निचऱ्याद्वारे खतांचा अपव्यय होत नाही.

खते निवडताना ही घ्या काळजी

– ठिबक सिंचन संचातून झाडांना देण्यासाठी निवडलेली खते ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असणे गरजेचे आहे – ठिबक सिंचन संचातील विविध घटकांवर खतांच्या मिश्रणाचा विपरीत परिणाम होणार नाही, अशीच खते निवडावीत. – झाडांना देत असलेल्या खताच्या सिंचनासाठी वापरात असलेल्या पाण्यातील घटकावर रासायनिक प्रक्रिया होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची खते नत्र खते

सर्वसाधारण द्रवरूप अमोनिया ( 82 टक्के ) युरिया सल्फेट (35 टक्के ), युरिया अमोनिअम नत्रयुक्त खते आहेत. यापैकी युरिया हे खत पाण्यात पूर्ण विरघळणारे आहे व त्याची पाण्याशी कोणत्याही प्रकारची संयुगे तयार होत नसल्यामुळे, हे खत ठिबक सिंचनाद्वारे देणे फायदयाचे ठरते.

स्फुरदयुक्त खते

ठिबक सिंचनाद्वारे स्फुरदयुक्त खते देणे थोडे अवघड आहे. अमोनिअम फॉस्फेट ( 16: 20 : 0 ), युरिया फॉस्फेट ( 17: 43 : 0 ), मोनो अमोनिअम फोस्फेट ( 18:46 : 0 ) यांसारखी स्फुरदयुक्त खते पाण्यामध्ये पूर्णतः विरघळणारी असल्यामुळे, त्याचा ठिबक सिंचनाद्वारे द्रवरुपात वापर करता येतो. फॉस्फरिक आम्लसुध्दा ठिबक सिंचनाद्वारे देणे चांगले दिसून आले आहे. स्कुरदाची हालचाल मंदगतीने होत असल्यामुळे, ते फक्त पृष्ठभागावरच साठवण्याची शक्यता असते, त्यामुळे ठिबक सिंचनद्वारे स्फुरदयुक्त खते देणे तेवढे फायद्याचे राहणार नाही.

(सदरील माहिती ही मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सुमंत जाधव यांच्या प्रकाशित झालेल्या लेखातून घेतलेली आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच खताचा वापर ठरवावा.)

संबंधित बातम्या :

Silk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..!

नैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय ?

APMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.