Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला ‘सोन्या’चा भाव

निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली असली तरी उन्हाळ्यातील हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना तारले आहे. आतापर्यंत कलिंगडला विक्रमी दर मिळाला होता आता त्याचप्रमाणे लिंबाच्या दरातही वाढ पाहवयास मिळत आहे. हंगामाची सुरवात होण्यापूर्वी 20 ते 25 रुपये किलोवर असलेले लिंबू आता थेट 125 रुपये किलोंवर पोहचले आहे. असे असले तरी या पिकावरही निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा झालेलाच आहे. खरीप हंगामातील पिकांप्रमाणेच उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर आता वाढत आहेत.

Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला 'सोन्या'चा भाव
वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 4:13 PM

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Main Crop) मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली असली तरी उन्हाळ्यातील (Seasonable Crop) हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना तारले आहे. आतापर्यंत कलिंगडला विक्रमी दर मिळाला होता आता त्याचप्रमाणे (Lemon Rate) लिंबाच्या दरातही वाढ पाहवयास मिळत आहे. हंगामाची सुरवात होण्यापूर्वी 20 ते 25 रुपये किलोवर असलेले लिंबू आता थेट 125 रुपये किलोंवर पोहचले आहे. असे असले तरी या पिकावरही निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा झालेलाच आहे. खरीप हंगामातील पिकांप्रमाणेच उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर आता वाढत आहेत. किमान त्यामुळे का होईना वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढतात पण यंदाची विक्रमी वाढ असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता मुख्य बाजारपेठांशिवाय स्थानिक पातळीवरही लिंबाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकीचाही प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झाले नाही ते यंदा हंगामी पिकातून शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर

यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीला ढगाळ वातावरणामुळे लिंबाच्या मागणीवर परिणाम होणार असेच चित्र होते. पण आता परस्थिती बदलली आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे 25 रुपये किलो असणारे लिंबू आज नगावर विकावे लागणार का अशी परस्थिती आहे. ठोक बाजारात 125 रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरीच्या वातावरणातील बदलामुळे लिंबाला काळे डाग असले तरी मागणीत वाढ झाल्याने असे डागाळलेल्या लिंबाला देखील मागणी कायम आहे.

वाढत्या दराचा परिणाम शीतपेयांवरही

उन्हाळ्यात लिंबू विकण्यासाठी शेतकऱ्यांकडून योग्य नियोजन केले जाते, त्यानुसारच लागवडही केली जाते यंदा शेतकऱ्यांनी नियोजन केले असले तरी निसर्गाच्या अनियमिततेमुळे सर्व काही बरबाद झाले आहे, स्थानिक शेतकऱ्यांकडे लिंबू नाही आणि व्यापाऱ्यांनाही लिंबू आयात करणे अवघड जात आहे.माल शिल्लक राहिला तर योग्य भाव मिळत नाही आणि विक्रमी भाव असताना माल नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी लिंबाची आयात करीत आहेत पण मर्यादित स्वरुपामध्ये. कारण अधिकची आवक करुन मागणी घटली तर अधिकचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही दराला घेऊन सावध आहे. पण लिंबाचे वाढते दर पाहता उद्या शीतपेयाचेही दर वाढतील अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

लिंबाच्या बागांनाही अवकाळीचा फटका

सध्या लिंबाला विक्रमी दर मिळत असला तरी यापूर्वीची स्थिती हा बिकट होती. अवकाळीची अवकृपा सर्वच पिकांवर राहिलेली आहे. त्याचप्रमाणे लिंबू बागांचीही यामधून सुटका झालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे चित्र एका रात्रीत बदलत आहे.त्याचप्रमाणे लिंबाच्या उत्पादनात फारसा फरक पडला नसून आता विक्रमी दर मिळत आहे हेच फायद्याचे ठरत आहे.

संबंधित बातम्या :

उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर

Beed : बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध, मार्ग निघत नसल्याने शेतकरी आक्रमक

Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.