Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खरिपात मागणीपेक्षा बियाणे अधिक, रासायनिक खतांचे काय ?

खरीप हंगाम करीता घरचे सोयाबीन बियाणे मोहिम राबविण्यात आली होती. राज्यामध्ये शेतकऱ्यांनी घरचे तयार केलेले 4 लाख 9 हजार क्विंटल इतके सोयाबीन बियाणे उपलब्ध झालेले आहे व याबरोबरच गतवर्षीच्या उन्हाळी हंगामात त्रुटिपूर्ती सोयाबीन बिजोत्पादन घेण्यात आलेला असुन 62 हजार 928 हे क्षेत्रावर रब्बी / उन्हाळी पेरणी करण्यात आली आहे.

Kharif Season : खरिपात मागणीपेक्षा बियाणे अधिक, रासायनिक खतांचे काय ?
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 3:45 PM

मुंबई : यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना (Kharif Seeds) बी-बियाणांची चिंता नाही. बियाणांमध्ये वाढ व्हावी या दृष्टीकोनातून महाबीज, कृषी विभागाने प्रयत्न केले शिवाय उन्हाळी हंगामात सोयाबीनचे उत्पादन क्षेत्र वाढले होते. त्या दरम्यानही शेतकऱ्यांनी बियाणांचा प्रयोग केला होता. विशेष म्हणजे (Soybean Seed) सोयाबीन बियाणावरच शेतकरी आणि कृषी विभागाचा भर राहिलेला आहे. त्यामुळेच यंदा (Kharif Season) खरीप हंगामात राज्यासाठी 17 लाख 95 हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता असताना कृषी विभाग येथील खासगी संस्थांकडे तब्बल 19 लाख 88 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असणार आहे. सर्वांच्या प्रयत्नातून बियाणांचा प्रश्न मिटला असला तरी यंदा धास्ती आहे ती रासायनिक खताची. याबाबत राज्य सरकारने पुरवठ्याबाबत अधिकृत माहिती सांगितली नसली तरी खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 45 लाख 20 हजार मे.टन रासायनिक खत उपलब्ध होणार असून त्यापैकी 9 लाख 8 हजार लाख मे.टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात 16 लाख 98 हजार मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे बियाणांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी रासायनिक खतासाठी मात्र, धावपळ होणार हे निश्चित.

बियाणांचे असे झाले नियोजन

खरीप हंगाम करीता घरचे सोयाबीन बियाणे मोहिम राबविण्यात आली होती. राज्यामध्ये शेतकऱ्यांनी घरचे तयार केलेले 4 लाख 9 हजार क्विंटल इतके सोयाबीन बियाणे उपलब्ध झालेले आहे व याबरोबरच गतवर्षीच्या उन्हाळी हंगामात त्रुटिपूर्ती सोयाबीन बिजोत्पादन घेण्यात आलेला असुन 62 हजार 928 हे क्षेत्रावर रब्बी / उन्हाळी पेरणी करण्यात आली आहे. रब्बी/उन्हाळी सोयाबीन पिकाचे अंदाजित बियाणे उत्पादन 2 लाख 70 लाख क्विंटल होणार असून स्थानिक पातळीवर घरचे सोयाबीन बियाणे मोहीमेद्वारे एकूण 48 लाख 17 हजार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

रासायनिक खताच्या पुरवठ्याबाबत संभ्रम, दर मात्र स्थिर

खरीप हंगामील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 45.20 लाख मे.टन रासायनिक खत उपलब्ध होणार असून त्यापैकी 9.08 लाख मे.टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात 16.98 लाख मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण निविष्टा मिळण्यासाठी आणि त्यामधील नुकसान टाळण्यासाठी 395 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये खताच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे युरिया, डी.ए.पी चे दर स्थिर ठेवणेसाठी केंद्र शासनास वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने व विशेषता मंत्री कृषि यांचे प्रयत्नाने यश प्राप्त झाले असुन दर स्थिर राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

उत्पादन वाढीसाठी सरकारचे प्रयत्न

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याासाठी कृषी विभागाकडून विविध योजना तर राबवल्या जातातच पण ऐन हंगामात बियाणे आणि रासायनिक खतांची टंचाई भासू नये यासाठी हंगामपूर्व बैठकांचे आयोजन केले जाते. गेल्या महिनाभरापासून जिल्हा निहाय आढावा बैठका पार पडत आहे. सर्व जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर कृषी विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली असून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सदैव प्रय़त्न केले जाणार आहे. वेळप्रसंगी चौकटी बाहेरा जाऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.