50 टन डाळिंबाच्या उत्पन्नातून सत्तर लाख कमावले
latest maharashtra farmer news : महाराष्ट्रातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवरती, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

महाराष्ट्र : माळशिरस (Malshiras) तालुक्यातील जांभूळ गावातील (jabhul) अण्णा पाटील जांभूळ यांनी डाळिंबाच्या पंधराशे झाडावर जवळपास 40 ते 50 टन डाळिंबाचे उत्पन्न घेतले आहे. सध्या या डाळिंबाची 170 रुपये विक्री करण्यात आलेली आहे. तर हा डाळिंब सध्या बांगलादेशी (bangladeshi) पाठवण्यात येत आहे. त्यानंतर अजून राहिलेल्या पंधराशे झाडाच्या डाळिंबातून जवळपास एक कोटींच्यावरती उत्पन्न मिळणार असल्याचे अण्णा पाटील जांभुळ यांनी सांगितले आहे. 3 हजार झाडाच्या देखभालीसाठी वर्षभरात साडेचार लाख रुपये खर्च करून बाग सांभाळली. उत्तम नियोजन करून देखभाल करून कमी फवारणीत कमी खर्चात बागेची देखभाल केल्याने उत्पन्नही चांगले मिळाल्याचे अण्णा पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी येणाऱ्या दिवसात दिलासादायक स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नवीन कांद्याची लागवड सुरू आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पुढच्या चार दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे पुढच्या अडीच तेथील महिन्यात चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात येईल. त्याची चांगली किंमत शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज सध्या नाशिकच्या बाजारांमध्ये वर्तवला जातो आहे.
शेतक-यांचा जनआक्रोश मोर्चा जलसंपदा कार्यालयावर धडकला आहे. निळवंडे धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. 182 गावात वर्षानुवर्ष दुष्काळ आहे. दुष्काळी भागासाठी बनवण्यात आलेल्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
बैल पोळ्यानिमित्त साहित्य खरेदीकडे बळीराजाने फिरवली पाठ…
बळीराजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला पोळ्याचा सण उद्या असताना सर्जा-राजाला सजवण्यासाठी गोंडे, घुंगरू, वेसण, घुंगरमाळा, कवड्यांच्या माळा, कलर असे विविध साहित्य विक्रीसाठी येवल्याच्या बाजारात दाखल झाले आहे. मात्र बळीराजाने या साहित्य खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.