बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे शंभूराज देसाईंचे निर्देश
पालकमंत्री आणि वाशिमचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून आली तर ती तात्काळ दाखल करून संबंधित कंपनी वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
वाशिम: कोरोनाच्या संकटामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर यंदाही बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट आलं आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या अनेक तक्रारी येत असल्याचं खासदार भावना गवळी यांनी सांगितलं. पालकमंत्री आणि वाशिमचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून आली तर ती तात्काळ दाखल करून संबंधित कंपनी वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. शंभूराज देसाई वाशिममध्ये शिवसंपर्क अभियानांतर्गत आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का?
पुणे आयुक्तांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली का याबद्दल पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता शंभूराज देसाई यांनी अधिक बोलणं टाळलं. कोणाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रश्न असेल तर पक्षप्रमुख हे निर्णय घेतात त्यावर मी बोलणं योग्य नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा विपर्यास
पंकजा मुंडे यांच्य बद्दल बोलायचं झालं तर मी एक बोललो पत्रकारांनी एक दाखविलं आहे. भाजपामध्ये पंकजा ताई नाराज आहेत त्यावरून मी त्यांना त्या स्वतः शिवसेनेत येत असणार तर त्यासाठी शिवसेनेत त्याच स्वागत म्हटलं होत. मात्र, त्याउलट आमंत्रण दिले असल्याच्या बातम्या चालविल्या असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.
वाशिममध्ये गणेश मूर्तींच्या निर्मितीला वेग
वाशिम जिल्ह्यात गणेशोत्सवाकरीता लागणाऱ्या गणेश मूर्त्यांच्या निर्मितीला वेग आला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवांवर मर्यादा कायम राहणार असल्याने मोठ्या गणेश मूर्त्यांच्या तुलनेत घरगुती स्थापन करावयाच्या लहान मूर्त्या बनविण्याकडे वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकारांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कामरगाव इथं गणेश मूर्ती निर्मितीला वेग आला असून मूर्तीकारावर मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी शासनाने प्रतिबंध टाकले असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करिता 4 फूट तर घरगुती गणपती 2 फूट मूर्तीची उंची ठेवण्याचे निर्बंध प्रशासनाने मूर्तीकरांवर लादलेल्यामुळे यावर्षी सुद्धा मूर्तिकार अडचणीत सापडला असून त्याचा खर्च वसूल होणार नसल्याने कुटुंबाच वर्षभर उदरनिर्वाह करणे कठीण होणार आहे.त्यामुळे मूर्तीकार शासनाला आर्थिक मदत करण्याची मागणी करत आहेत.
इतर बातम्या:
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6 हजार पती-पत्नी दोघांनाही मिळतात का? नेमका नियम काय?
Shambhuraj Desai said action will take on seed companies who provide fake soybean seeds if farmer will complaint