रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले, बाजारपेठही उपलब्ध आता विभागाच्या एका निर्णयामुळे मराठवाड्यातील शेतकरी समृध्द
केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे याप्रमाणेच मराठवाड्यात रेशीम शेतीचा प्रवास राहिलेला आहे. मराठवाड्यातील केवळ बीड आणि जालना जिल्ह्यात तुतीची लागवड केली जात होती. मात्र, रेशीम शेतीचे महत्व आणि या विभागाने दिलेले योगदान यामुळे रेशीम शेती क्षेत्रात तर वाढ झालीच आहे पण जालना आणि बीड येथे खरेदी केंद्राच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली होती.
जालना: केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे याप्रमाणेच (Marathwada) मराठवाड्यात रेशीम शेतीचा प्रवास राहिलेला आहे. मराठवाड्यातील केवळ बीड आणि जालना जिल्ह्यात तुतीची लागवड केली जात होती. मात्र, (Silk Farming) रेशीम शेतीचे महत्व आणि या विभागाने दिलेले योगदान यामुळे रेशीम शेती क्षेत्रात तर वाढ झालीच आहे पण जालना आणि बीड येथे खरेदी केंद्राच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली होती. असे असले तरी (Silk Quality) रेशीम कोषाची गुणवत्ता शेतकऱ्यांना कळत नसल्याने त्यामधील त्रुटी लक्षात येत नव्हत्या. त्यामुळे रेशीम कोषाची गुणवत्ता तपासणीसाठी थेट कर्नाटकाला जावे लागत होते. मात्र, आता जालन्यातील खरेदी केंद्रावरच गुणवत्ता चाचणी सुरु होणार असल्याची माहिती रेशीम विभागाने दिली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही शिवाय रेशीम कोणत्या दर्जाचे आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यातील पहिले रेशीम खरेदी उपकेंद्र जालन्याला
जालना जिल्ह्यात जसे तुती लागवडीचे क्षेत्र वाढत गेले त्यानुसार शेतकऱ्यांना बाजारपेठही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचअनुशंगाने एप्रिल 2018 मध्ये जालना येथे रेशीम खरेदीचे पहिले उपकेंद्र सुरु करण्यात आले होते. यामुळे राज्यभरातील 15 हजार 550 शेतकऱ्यांकडून तब्बल 1 हजार 350 टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले आहे. खरेदीसाठी राज्यभरातून तसेच कर्नाटकातील व्यापारी येथे दाखल होत होते. आता रेशीम कोष गुणवत्ता चाचणीही होणार असून चांगला दरही मिळणार आहे.
…म्हणून जालना येथे गुणवत्ता चाचणी होणार
जालना रेशीम शेतीच्या अनुशंगाने महत्वाची बाजारपेठ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही हक्काची बाजारपेठे मिळाली असून रेशीमला योग्य दर मिळू लागला आहे. येथील वाढती बाजारपेठ पाहता रेशीम विभागाने येथे विविध सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिवाय उच्च गुणवत्ता असलेले रेशीम कोष उत्पादन करण्यात मराठवाड्यासह जालना जिल्ह्याचा मोठा सहभाग आहे. खानदेश, विदर्भ, ठाणे, अहमदनगर येथील शेतकरीही जालना बाजारपेठच जवळ करीत आहेत.त्यामुळे जालना येथे गुणवत्ता तपासली जाणार आहे.
कशी होते कोषाची गुणवत्ता तपासणी?
रेशीम कोषची विक्री करण्यापूर्वी कोषाचे नमुने हे तपासणीसाठी खरेदी केंद्रावर शेतकरी आणतो. हे कोष परीक्षणासाठी ठेवून त्यातील अळी ही किती दिवसांनी बाहेर पडते याचे परीक्षण केले जाते. किती उच्च प्रतीचा धागा यातून निघेल हे या ठिकाणी परीक्षणानंतर कळणार आहे. याच्या आधारे शेतकऱ्याला त्याच्या उत्पादित रेशीमची बाजारातील किंमत काढता येणार आहे.
संबंधित बातम्या:
हवामान खात्याचा अंदाज अन् शेतकऱ्यांची लगीनघाई, शेतशिवारात नेमकं चाललयं तरी काय?
खरिपात भासणार खतांचा तुटवडा, गतवर्षी अतिवृष्टीने तर यंदा खताअभावी उत्पादनावर परिणाम..!
कांदा बिजोत्पादन : बियाणांबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन, किडीवर मिळवा असे नियंत्रण..!