Onion Rate : कांद्याचा वांदा होण्यामागे नेमके कारण काय ? 2 महिन्यांपासून दराची घसरगुंडी कायम
दराच्या तुलनेत विदेशात पाकिस्तानी कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे साहजिकच पाकिस्तानच्या कांद्याला अधिकची मागणी आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून गेल्या दोन महिन्यापासून कांद्याच्या दरात केवळ घसऱण सुरु आहे. उन्हाळी कांद्याची आवक वाढली असताना ही परस्थिती निर्माण झाल्याने काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचे लिलाव देखील होत नाही ही स्थिती आहे.
मुंबई : (Onion Rate) कांदा दराचा लहरीपणा हा उत्पादकांनाच नव्हे तर आता ग्राहकांनाही माहित झाला आहे. पण लहरीपणा काही काळापुरता मर्यादित असतो पण यावेळी गेल्या अडीच महिन्यापासून दरातील घसरण ही सुरुच आहे. घटत्या दराबद्दल तर्क-वितर्क लावले जात असले तरी नेमके कारण काय हे दखील समोर येणे गरजेचे आहे. तर (Onion Export) कांद्याचे दर घटन्यामागे श्रीलंकेतील दिवाळखोरी आणि बांग्लादेशातील कडकी असल्याचे समोर येत आहे. आता महाराष्ट्राचा कांदा आणि या दोन देशाचा संबंध काय असा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे. मागणीच्या तुलनेत (Onion Arrival) कांद्याचा पुरवठा अधिक झाल्याने निर्यात घटली आहे. पण या दोन देशाकडून कांदा खरेदीसाठी उत्पादकांना पायघड्या घातल्या जात आहेत. पण या दोन्ही देशाकडून पाठवलेल्या मालाचा मोबदला मिळेल की नाही अशी परस्थिती आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी या दोन्ही देशातील निर्यातीकडे पाठ फिवरली आहे. परिणामी कांद्याची निर्यातच रोखली गेल्याने राज्यात कांदा 1 रुपया, 2 रुपये किलो अशी स्थिती झाली आहे.
पाकिस्तानी कांद्याला अधिकची मागणी
दराच्या तुलनेत विदेशात पाकिस्तानी कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे साहजिकच पाकिस्तानच्या कांद्याला अधिकची मागणी आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून गेल्या दोन महिन्यापासून कांद्याच्या दरात केवळ घसऱण सुरु आहे. उन्हाळी कांद्याची आवक वाढली असताना ही परस्थिती निर्माण झाल्याने काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचे लिलाव देखील होत नाही ही स्थिती आहे. यंदा प्रतिकूल परस्थितीमध्येही कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे यंदाचा दरातील लहरीपणा शेतकऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.
30 रुपये किलोची मागणी असतानाही व्यापाऱ्यांचा नकार
देशांतर्गतच्या बाजारपेठेत कांद्याचे दर 1 ते 2 रुपये किलो असे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तर शेतकऱ्याने कांदा फुकटात वाटप केला तर तिकडे श्रीलंकेत कांद्याला 30 रुपये किलोप्रमाणे खरेदीची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे. असे असतानाही मालाचे पैसेच मिळतील की नाही याची शाश्वती नसल्यामुळे व्यापारी ते धाडस करीत नाहीत. त्यामुळे मागणी आहे तिथे पुरवठा नाही आणि अधिकचा पुरवठा असलेल्या ठिकाणी कवडीमोल दर अशी कांद्याची अवस्था झाली आहे.
कांदा दरात अशी झाली घसरण
उन्हाळी कांदा बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी खरिपातील लाल कांद्याला 30 ते 32 किलो रुपये असा दर होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला आहे. मात्र, उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात येताच दरात सुरु झालेली घसरण ही गेल्या अडीच महिन्यांपासून कायम आहे. आता उन्हाळी हंगाम अंतिम असताना कांद्याची आवक वाढत आहे तर दुसरीकडे दरातील घसरण ही सुरुच आहे. त्यामुळे 1 ते 2 रुपये किलो कांदा विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.