Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?

हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Fertilizer Rate: ...म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?
रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतामध्ये होणाऱ्या खत आय़ातीवर परिणाम होणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 1:23 PM

पुणे : हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर (Rabbi Season) रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच (Fertilizer) खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. भारत देशाला याची मोठी झळ बसत आहे कारण देशामध्ये (Fertilizer Production) खताचे उत्पादन होत नाही तर सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे. त्यामुळे खताची आयात प्रक्रिया ही महागडी होत आहे. शिवाय खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई निर्माण होत आहे. एकीकडे नैसर्गिक शेतीचे दाखले दिले जात असले तरी दुसरीकडे रासायनिक खतांची वाढती मागणी वाढत असलेले दर ही चिंतेची बाब आहे. शिवाय देशातील खतांचे चित्र सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे.

सर्वकाही आयातवरच अवलंबून

कच्च्या मालाची कमतरता आणि वाढत असलेली मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खतांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झालेली आहे. खताची गरज भागवण्यासाठी सर्वकाही आयातीवरच अवलंबून रहावे लागत आहे. देशात वर्षानिहाय खताचा वापर वाढत आहे. भारतामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 587 लाख टन खताची मागणी झाली आहे. तर प्रत्यक्ष आयात ही 203 लाख टन एवढी झाली आहे. म्हणजेच या 9 महिन्याच्या कालावधीतच वर्षाला लागणाऱ्या खताची मागणी झाली आहे. त्यामुळे 20 लाख टन खताची मागणी ही वाढलेली आहे. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये अधिकच्या दराने खत खरेदी करावे लागत आहे.

आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई

देशात सर्वाधिक डीएपी खताचा वापर होतो. तब्बल 12o लाख टनाच्या दरम्यान याची मागणी असते. यापैकी 60 टक्के गरज ही आयातीतून पूर्ण केली जाते. तर आयाती पैकी 40 टक्के खत हे चीनमध्ये आयात केले जाते. युरियाचा वापरही डीएपी प्रमाणेच वाढत आहे. त्यामुळे 30 टक्के गरज ही आय़ातीमधून भागवण्याची नामुष्की देशावर ओढावत आहे. मागणीच्या तुलनेच पोटॅशचा पुरवठा कमी असल्याने देशात मोठा तुटव़डा जाणवत आहे.

कृत्रिम टंचाईचाही शेतकऱ्यांना फटका

एकीकडे खताच्या दरात वाढ होत असली तरी स्थानिक पातळी कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने खताची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराचा थेट फटका बसू नये म्हणून सरकारने अनुदान दिले. मात्र, युरिया वगळता इतर खतांच्या दरातील वाढ आणि टंचाईही कायमच आहे.

संबंधित बातमी:

Sugarcane Sludge: राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात, साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना? वाचा सविस्तर

Strawberry : चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी, मस्त अन् स्वस्तही, पिकतं तिथंच विकतं, शेतकऱ्यांचं कष्टही कमी होतं?

पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.