Success Story: मातीशिवाय शेती करु लागला, लोकांनी येड्यातच काढलं, अन् आता डोक्यावर घेऊन नाचायचंच उरलंय!

शेती व्यवसयात बदल होतोय हे सत्य असले तरी मातीविना शेती हे अतियोशक्ती वाटत असेल, पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे अगदी याप्रमाणेच कळंब तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. तरुण शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहून सुरवातीच्या काळात त्यांना हिनवण्यात आले पण त्यांच्या यशोगाथेनंतर टीका करणारेच आता डोक्यावर घेत आहेत.

Success Story: मातीशिवाय शेती करु लागला, लोकांनी येड्यातच काढलं, अन् आता डोक्यावर घेऊन नाचायचंच उरलंय!
उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी मातीऐवजी कुंड्यामध्ये थेट कोकोपीट टाकून जेरबेराची लागवड केली आहे.
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 10:09 AM

उस्मानाबाद : शेती व्यवसयात बदल होतोय हे सत्य असले तरी (Soilless agriculture) मातीविना शेती हे अतियोशक्ती वाटत असेल, पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे अगदी याप्रमाणेच कळंब तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. तरुण शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहून सुरवातीच्या काळात त्यांना हिनवण्यात आले पण त्यांच्या यशोगाथेनंतर टीका करणारेच आता डोक्यावर घेत आहेत. कळंब तालुक्यातील बोर्डा येथील शितल चव्हाण आणि दिनेश चव्हाण यांनी (Polyhouse Farming) पॉलिहाऊस उभारुण बेडच्या मदतीने जेरबेरा बाग फुलवली मात्र, जमिनीतूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांनी मातीऐवजी (In the cistern) कुंड्यामध्ये थेट कोकोपीट टाकून जेरबेराची लागवड केली होती. यामुळे कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला असून 20 गुंठ्यामध्ये जेरबेरा बहरलेला आहे. हा प्रयोग नाविन्यपूर्ण असला तरी अनेक तरुण शेतकऱ्यांना प्ररेणादायी आहे.

नेमके कशामुळे घेतला निर्णय?

पारंपरिक शेतीला फाटा देत उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आता शेती व्यवसयामध्येही होत आहेत. त्याच अनुशंगाने बोर्डा येथील तरुण शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसची उभारणी केली. 20 गुंठ्यामध्ये बेडच्या माध्यमातून जेरबेराची लागवड केली. या अनोख्या उपक्रमाला ग्रहण लागले ते रोगराईचे. त्यामुळे उत्पादनात घट आणि हा प्रयोगच अयशस्वी होणार असेच चित्र निर्माण झाले होते. केवळ वातावरणामुळेच नाही तर मातीमधून रोगराईचा प्रादुर्भाव होतो.हे चव्हाण बंधुच्या निदर्शनास आले होते. पण मातीशिवाय शेती कशी? असा प्रश्न देखील उपस्थित झाला. पण यावर पर्याय म्हणून त्यांनी कुंड्यामध्ये कोकोपीट टाकून जेरबेराची लागवड केली. त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

खर्च कमी अन् उत्पादनाची हमी

जेरबेराची जोपसणा करताना आता माती ऐवजी कोकोपीटचाच वापर वाढला जात आहे. त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी होत आहे पण किटकनाशकांचा वापरही कमी झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. तीन महिन्याच्या कालावधीत किटकनाशकांचा वापर खूप कमी वेळा करावा लागला आहे. त्यामुळे खर्चही कमी झाला आहे. भविष्यात अशा पध्दतीचे प्रयोग वाढतील. काळाच्या ओघात शेतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. आणि या बदलाची नांदी ग्रामीण भागातून सुरु होत आहे हे विशेष.

बेड पध्दतीपेक्षा कुंड्याचा वापर ठरला फायदेशीर

पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेडचा वापर वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम होत नसला तरी मातीतून होणाऱ्या रोगाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळेच बेडच्या ऐवजी कुंड्यांचा वापर करुन जेरबेराची लागवड करण्यात आली होती. सध्या जेरबरा बहरात आहे. त्यामुळे चव्हाण बंधुंनी निवडलेला पर्याय यशस्वी ठरत आहे.

संबंधित बातम्या :

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात

Mango : फळमाशीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कोणत्या फळाला अधिकचा धोका?

Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.