शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे अधिक कल, 228 टक्के इतकी विक्रमी लागवड
सध्या सोयाबीनला अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबिन पेरणीकडे अधिक कल आहे अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
सोलापूर : सोयाबीनचे वाढते दर (soybean rate) पाहता सोलापुर (solapur news) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे अधिक कल आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनची 228 टक्के इतकी विक्रमी लागवड झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. खरीप हंगामातील (kharip season) 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात अन्नधान्य 58 टक्के, तृणधान्य 59 टक्के तर गळीत धान्याच्या 177 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली होती. ज्वारी, बाजरी, मका, कापूस, नवीन ऊस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग अशा पिकांचा समावेश आहे अशी माहिती राजकुमार मोरे उपसंचालक , जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, सोलापूर यांनी सांगितली.
नदीच्या बाजूची शेती खराब झाली
अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये आसना नदीला महापूर येऊन गेला आहे. या पुरामुळे नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीवरच्या पुलाच्या निर्मितीत अडथळा निर्माण झाला होता. पुरामुळे पुलासाईडचा एक ढासळली आहे. सध्या आसना नदीच्या एकमेव पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. नदीच्या बाजूची शेती खराब झाली आहे. शेतकरी मदतीच्या वाट पाहत आहेत.
गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. धापेवाडा बॅरेजमधून सोडण्यात येणारं पाण्यामुळं गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी आता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 1 लाख 87 हजार 204 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळं नदी काठची शेती संपूर्ण खराब झाली आहे.
गोदिया जिल्ह्यातील धापेवाडा येथील धरणामधून मोठया प्रमाणात पाणी विसर्ग होत असल्याने गोसेखुर्द धरणातीचे 33 ही दरवाजे पुढील काही तासात 1 मिटरनं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.