लॉकडाऊनची भीती, शेतकऱ्यानं आंबा विक्रीसाठी लढवली शक्कल, 2 दिवसात मिळालं यश

शेतकरी डॉ. केशव सरगर (Keshav Sargar) यांनी त्यांच्या बागेतील केशर आंबा (Mango) विक्रीसाठी नवा पर्याय स्वीकारला आहे.

लॉकडाऊनची भीती, शेतकऱ्यानं आंबा विक्रीसाठी लढवली शक्कल, 2 दिवसात मिळालं यश
केशव सरगर
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 1:19 PM

सोलापूर: एप्रिल महिना सुरु झाला असून बाजारात आता आंब्याची चाहूल लागली आहे. यावर्षी कोरोना विषाणू आणि नैसर्गिक संकटामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.  कोरोना संकटातही माळशिरस तालुक्यातील खुडूस गावातील शेतकरी डॉ. केशव सरगर  (Dr. Keshav Sargar)यांनी त्यांच्या बागेतील केशर आंबा विक्रीसाठी नवा पर्याय स्वीकारला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचा पर्याय स्वीकारण्याचं सरगर यांनी ठरवलं. आता त्यांच्याकडे आंब्यासाठी नोंदणी देखील झाली आहे. राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक असा पर्याय स्वीकारल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येणे शक्य आहे. (Solapur Keshav Sargar mango farmer opted farmer to customer method for sale mangoes due to lockdown)

गतवर्षी लॉकडाऊनचा फटका, यावर्षी मार्ग काढला

सोलापूर जिल्हा हा डाळींब व द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, खुडूस येथील शेतकरी डॉ. केशव सरगर हे अनेक वर्षांपासून केशर आंब्याचे चांगले उत्पादन घेतात.त्यांच्याकडे सहा एकर क्षेत्रावर केशर आंब्याची बाग आहे. दवर्षी ते सहा एकरातील तीन हजार झाडांपासून किमान 70 ते 80 टन केशर आंब्याचे उत्पादन घेतात. गेल्यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर राज्यासह देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे त्यांचा आंबा बाहेर देशात जावू शकला नाही. त्यामुळे यावर्षी केशर आंबा थेट उत्पादन ते ग्राहक असा विक्री पर्याय उपलब्ध केला असल्याचं डॉ. केशव सरगर सांगतात.

दोन दिवसांमध्ये चार टन आंब्यासाठी नोंदणी

सरगर नर्सरी येथून शेतकरी ते ग्राहक नव्या पर्यायी विक्री व्यवस्थेला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये स्थानिकांसह इतर भागातील अनेक शेतकऱ्यांनी चार टन आंब्याची आगाऊ नोंदणी केली आहे. ग्राहकांना 200 रुपये किलो या माफक दरात आंबा मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा फायदा होत आहे. या नव्या पर्यायी विक्री व्यवस्थेमुळे आंबा उत्पादक शेतकर्याचा वाहतूक आणि दलालीवर होणारा खर्च कमी झाला. तर ग्राहकांना ही सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या आंब्याची चव अगदी कमी किंमतीत चाखता येणार आहे, असं ग्राहक अविनाश भागवत ठवरे यांनी सांगितलं.

पणन महामंडळाचं सहकार्य

राज्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची भिती कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक नुकसान होवून यासाठी डॉ.केशव सरगर यांनी राज्य पणन महामंडळाच्या सहकार्याने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था उभी केली आहे. सरगर यांनी शेतकरी ते ग्राहक असा पॅटर्न निर्माण केल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या:

1 लाख रुपये किलोनं विकली जाणारी भाजी पिकवणारा शेतकरी! कुठे होतं उत्पादन? वाचा सविस्तर

 बारावी पास शेतकऱ्याने बडीशेप लागवडीतून मिळवला मोठा नफा, वर्षाकाठी करतो 25 लाखांची कमाई

(Solapur Keshav Sargar mango farmer opted farmer to customer method for sale mangoes due to lockdown )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.