Grape : द्राक्ष शेतीसमस्यांवर रामबाण उपाय, द्राक्ष बागायतदार संघाचा मोठा निर्णय..!

द्राक्ष बागायतदार संघाने आता राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेशी करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल असा आशावाद आहे. गेल्या काही वर्षातील नुकसान आणि घटते उत्पादन यामुळे बागायदार संघाने हा निर्णय घेतला असून याचा फायदा होणार का हे पहावे लागणार आहे.

Grape : द्राक्ष शेतीसमस्यांवर रामबाण उपाय, द्राक्ष बागायतदार संघाचा मोठा निर्णय..!
द्राक्ष बागांचे नुकासान टाळण्यासाठी आता द्राक्ष बागायतदार संघाने संशोधन संस्थांशी करार केला आहे.
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 4:04 PM

पुणे : वातावरणातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे गेल्या 4 वर्षापासून (Vineyard) द्राक्ष बागांचे नुकसान हे ठरलेले आहे. त्यामुळे (Nashik Farmer) नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी हे आता पीक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. असे असताना द्राक्ष शेतीमधील समस्या सोडवण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघानेच मोठा निर्णय घेतला आहे. या संघाने आता दोन संस्थांशी समजंस्य (Agreement) करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील आणि दरवर्षी होणारे नुकसान हे कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. नव्या संशोधन समितीमध्ये नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय कृषी विद्यापीठाचेही सहकार्य लाभणार आहे.

शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार अत्याधुनिक तंत्र

द्राक्षावरील किड-रोगराईवर संशोधन करुन त्याचा बंदोबस्त कसा करायचा यावर संस्था ही कार्य करणार आहे. तर या संस्थेला राज्यातील कृषी विद्यापीठाचे सहकार्य राहणार आहे. या सर्वांच्या सहकार्यातून जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते शेतऱ्यांपर्यंत पोहचवले जाणार आहे. संशोधनाचा फायदा थेट शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने संघाने हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठांच्या माध्यमातूनही जे संशोधन होते त्याचा देखील फायदा या संस्थांना होणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बदलत्या वातावरणाचा द्राक्षावर परिणाम

गेल्या 4 वर्षात द्राक्ष उत्पादनातून नफा तर सोडाच पण शेतकऱ्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. यंदा तर बागा अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले होते. यंदा सर्वच फळबागांचे उत्पादन घटले आहे. ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस यामुळे द्राक्ष उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिकची घट झाली होती. आता बागायतदार संघाने संशोधन संस्थेशी करार केला आहे. त्यामुळे याचा परिणाम कसा होणार हे देखील पहावे लागणार आहे.

संस्थांच्या नियोजनाचा फायदाच होईल

द्राक्ष बागायतदार संघाने आता राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेशी करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल असा आशावाद आहे. गेल्या काही वर्षातील नुकसान आणि घटते उत्पादन यामुळे बागायदार संघाने हा निर्णय घेतला असून याचा फायदा होणार का हे पहावे लागणार आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.