Nanded : काय सांगता? पावसाअभावी नाही तर पावसामुळे दुबार पेरणीचे संकट..!
मराठावाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अद्यापही खरीप पेरणीचा श्रीगणेशाच झालेला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त आहे. सर्वदूर असा पाऊस झालेलाच नाही. तर दुसरीकडे हदगाव तालुक्यात पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की, पेरणी झालेले क्षेत्र पाण्यात आहे. पेरणी होताच अधिकचा पाऊस होऊन पाणी साचून राहिले किंवा त्याचा निजरा झाला नाही तर मात्र दुबार पेरणी करावी लागते.
नांदेड : पावसाने ओढ दिल्याने सबंध राज्यातील (Kharif Season) खरिपाचे चित्र बदलले आहे. अशातच पावसामुळे दुबार पेरणी कशी असा सवाल पडणे साहजिक आहे. मात्र, (Monsoon) मान्सून किती लहरीचा आहे याचा प्रत्यय नांदेडकरांना आलाय. निम्मा जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत असताना शनिवारी सायंकाळी हादगांव तालुक्यातील जांभळा शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे ओढे-नाले तर तुडूंब भरुन वाहिलेच पण शेतशिवारातही पाणी साचले आहे. पेरणी झालेले क्षेत्र सध्या पाणीखाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना (Re-sowing) दुबार पेरणी करावी लागणार आहे. एकीकडे पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत तर दुसरीकडे हादगाव तालुक्यातील काही भागात पाणीच पाणी झाल्याने परस्पर विरोधी स्थिती निर्माण झाली आहे.
दुबार पेरणी कशामुळे?
मराठावाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अद्यापही खरीप पेरणीचा श्रीगणेशाच झालेला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त आहे. सर्वदूर असा पाऊस झालेलाच नाही. तर दुसरीकडे हदगाव तालुक्यात पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की, पेरणी झालेले क्षेत्र पाण्यात आहे. पेरणी होताच अधिकचा पाऊस होऊन पाणी साचून राहिले किंवा त्याचा निजरा झाला नाही तर मात्र दुबार पेरणी करावी लागते. तशीच स्थिती सध्या जांभळा गावच्या शिवरात आहे. त्यामुळे एकीकडे पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत तर दुसरी अधिकच्या पावसाने ही वेळ ओढावली आहे.
शेतकऱ्यांचा मुक्काम शेतातच
आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. नांदेड जिल्ह्यात हंगामाच्या सुरवातीपासूनच मान्सूनने कृपादृष्टी दाखवली असली तरी शनिवारचे चित्र तरा वेगळेच होते. शनिवारी सायंकाळी जांभळा शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे शेतावर गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा घराकडे परत येणेही मुश्किल झाले होते. तर दुसरीकडे देगलूर तालुक्याला रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
चार गावचा संपर्कही तुटला
एका रात्रीतून जिल्ह्यातील देगलूर आणि हादगाव तालुक्यातील चित्र पावसाने बदलले आहे. कालपर्यंत पावसाची वाट पाहणारे शेतकरी आज समाधानी झाले आहे. जांभळा गाव परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने चार गावचा संपर्क तुटला होता. गावालगत असणारे नदी, नाले हे एकाच पावसात ओसंडून वाहत होते. त्यामुळे आता खरिपात सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.