Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Crop : पेरलं..उगवलं पण बहरलेल्या सोयाबीनला फलधारणाच नाही, उन्हाळी हंगामतही प्रयोग फसला

शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. खरिपात नुकसान झाले तरी याची भरपाई उन्हाळी हंगामातून भरुन काढण्यासाठी यंदा प्रथमच उन्हाळ्यात विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. शिवाय पाणी आणि पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादनही होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. सध्या उन्हाळी पीक हे अंतिम टप्प्यात आले आहे. काढणी काही दिवसांवर आली असतानाच सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे चित्र नायगांव मधल्या आनंद बावणे यांच्या क्षेत्रात आहे.

Summer Crop : पेरलं..उगवलं पण बहरलेल्या सोयाबीनला फलधारणाच नाही, उन्हाळी हंगामतही प्रयोग फसला
उन्हाळी हंगामातील सोयबीन अंतिम टप्प्यात असताना फलधारणा झालीच नाही त्यामुळे नुकसान होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 10:53 AM

नांदेड : (Kharif Season) खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपात झालेले नुकासन भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा (Summer Soybean) उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला होता. पोषक वातावरण आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे बेहंगामी असलेले (Soybean) सोयाबीन उगवलंही आणि बहरलंही. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनचा मोठा आधार मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण जिल्ह्यातील नायगांव परिसरातील सोयाबीनला फलधारणाच झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऐन अंतिम टप्प्यात ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शणास आल्याने शेतकऱ्यांना आता काही पाऊलही उचलता येत नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

नेमकी सोयीबीनची स्थिती काय ?

शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. खरिपात नुकसान झाले तरी याची भरपाई उन्हाळी हंगामातून भरुन काढण्यासाठी यंदा प्रथमच उन्हाळ्यात विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. शिवाय पाणी आणि पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादनही होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. सध्या उन्हाळी पीक हे अंतिम टप्प्यात आले आहे. काढणी काही दिवसांवर आली असतानाच सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे चित्र नायगांव मधल्या आनंद बावणे यांच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे वर्षभराची मेहनत तर वाया गेलीच पण ज्या अपेक्षा होच्या त्या देखील फोल ठरल्या आहेत.

नुकासान भरपाईची मागणी

शेती व्यवसयात वेगवेगळे प्रयोग करणे आणि त्यासाठीची मेहनत एवढेच काय ते शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे. त्यानंतरचा बाजारभाव आणि निसर्गाचा लहरीपणा हे शेतकऱ्यांच्या हाती नाही. खरिपातील सोयाबीनप्रमाणेच उन्हाळी सोयाबीनलान उतारा पडेल असे चित्र झाले होते. पण सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. फलधारणेबाबत नेमके काय झाले याकरिता पंचनामे करावेत आणि बियाणे कंपनीकडून नुकसान भऱपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आनंद बावणे या शेतकऱ्याची गेल्य़ा 3 महिन्यातली मेहनत वाय़ा गेलीच पण बरोबरीने पैसाही.

हे सुद्धा वाचा

बियाणांबाबत दरवर्षी तक्रारी

बियाणांमधून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक हे काही नवीन नाही. दरवर्षी असे प्रकार घडतातच. ते ही ऐन पीक अंतिम टप्प्यात हे समोर येत असल्यामुळे काही करताही येत नाही. दरवर्षी बियाणांबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. कृषी विभागाकडून कारवाईसाठी पथकांची नेमणूक होऊन देखील धोका टळलेला नाही. त्यामुळे यंदा पंचनाम्यातून काय समोर येणार आणि संबंधितावर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.