Soybean Market : सोयाबीनच्या दरात वाढ, साठवणूक की विक्री प्रश्न कायम..!
गेल्या 15 दिवसांपासून 7 हजार 250 वर स्थिरावलेले सोयाबीनचे दर वाढणार की नाही ? याचे उत्तर मिळाले तरच सोयाबीनची विक्री की साठवणूक याचा निर्णय होणार. अशीच काहीशी परस्थिती आता शेतकऱ्यांची होऊन बसली आहे. मध्यंतरी 7 हजार 600 वर पोहचलेले सोयाबीन आता थेट 7 हजार 200 वर येऊन ठेपले आहे. शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र, 7 हजार 300 रुपये दर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला होता. यामध्ये किंचित वाढ झालेली असली तरी शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहणार की सोयाबीनची विक्री करणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
लातूर : गेल्या 15 दिवसांपासून 7 हजार 250 वर स्थिरावलेले (Soybean Rate) सोयाबीनचे दर वाढणार की नाही ? याचे उत्तर मिळाले तरच सोयाबीनची विक्री की साठवणूक याचा निर्णय होणार. अशीच काहीशी परस्थिती आता (Farmer) शेतकऱ्यांची होऊन बसली आहे. मध्यंतरी 7 हजार 600 वर पोहचलेले सोयाबीन आता थेट 7 हजार 200 वर येऊन ठेपले आहे. शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र, 7 हजार 300 रुपये दर (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला होता. यामध्ये किंचित वाढ झालेली असली तरी शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहणार की सोयाबीनची विक्री करणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. सोयाबीनचे दर वाढून पुन्हा घटल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. विक्री केली तर मध्यंतरीच्या तुलनेत क्विंटलमागे 400 रुपये नुकसान सहन करावे लागणार आहे. आणि विक्री केली अन् भविष्यात दर वाढले तर. या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. त्यामुळे दरात किंचित सुधारणा झाली असली तरी आवक मात्र 18 हजार पोत्यांवरच आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा
आतापर्यंत वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. शिवाय जानेवारी महिन्यात यंदाच्या हंगामातील विक्रमी म्हणजेच 7 हजार 600 असा दरही मिळाला होता. मात्र, शेतकऱ्यांना यापेक्षा दर वाढतील अशी अपेक्षा होती. पण आता दर स्थिरावले आहेत. त्यामुळे आहे त्याच दरात विक्री करावी की अजून वाढीव दराची वाट पहावी या संभ्रमात शेतकरी आहेत. त्यामुळे अजूनही सोयाबीन थप्पीलाच आहे. आता खरिपाची लगबग सुरु होईल असे असतानाही शेतकऱ्यांनी वाढीव दरासाठी कायपण अशीच भूमिका घेतली आहे.
सोयाबीन अन् हरभऱ्याची आवक सुरु
सध्या रब्बी हंगामातील पीक काढणीची कामे सुरु आहेत. याचा परिणाम शेतीमालाच्या आवक झाला आहे. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु आहे. हरभऱ्याची दिवसाकाठी 22 ते 25 हजार पोत्यांची आवक होत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनची 17 हजार पोत्यांची आवक शनिवारी झाली होती.
दर वाढूनही तुरीची आवक घटलेली
सध्या तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. खुल्या बाजारपेठेत 6 हजार 450 तर खरेदी केंद्रावर 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आला आहे. हमीभावापेक्षा अधिकचा दर असतानाही तुरीची आवक ही घटलेलीच आहे. उत्पादनात घट झाल्याने भविष्यात दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
संबंधित बातम्या :
Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!
Latur : प्रतीक्षा संपली, उर्वरित 25 टक्केही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर
Kokan : जे आंब्याचे तेच काजू बांगाचे, 30 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी