विक्री की साठवणूक..! सोयाबीनची वाटचाल 7 हजाराच्या दिशेने, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला ?
बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन 6 हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता 7 हजाराची वाट पाहताना दिसत आहेत. गेल्य़ा आठवड्यापासून जे सोयाबीनच्या दरात घडत आहे त्याची कल्पना शेतकऱ्यांनीच नाही व्यापाऱ्यांनीही केली नव्हती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून गेल्या चार महिन्यापासून साठवणूक केलेले सोयाबीन आहे त्या दरात विक्री करुन टाकावे या निर्णयावर शेतकरी आले होते.
लातूर : बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे (Soybean Production) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन 6 हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता 7 हजाराची वाट पाहताना दिसत आहेत. गेल्य़ा आठवड्यापासून जे (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात घडत आहे त्याची कल्पना शेतकऱ्यांनीच नाही (Traders) व्यापाऱ्यांनीही केली नव्हती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून गेल्या चार महिन्यापासून साठवणूक केलेले सोयाबीन आहे त्या दरात विक्री करुन टाकावे या निर्णयावर शेतकरी आले होते. शिवाय पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर दर अणखीन कमी होतील याची धास्ती शेतकऱ्यांना होती. या सर्व प्रतिकूल परस्थितीमध्ये मात्र, सोयाबीनची आता विक्रमी दराकडेन वाटचाल सुरु झाली आहे. जे चार महिन्यात झाले नाही ते आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात होऊ लागले आहे. त्यामुळे एवढ्या दिवस वाढीव दराची वाट पाहिली आता विक्रमी दरानेच विक्री करा असा सल्ला व्यापारी देत आहेत. मंगळवारी सोयाबीनला 6 हजार 830 रुपये प्रति क्विंटल असा दर होता.
तीन दिवसांमध्ये 300 रुपयांनी वाढले दर
15 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचे दर हे स्थिरच होते. सबंध जानेवारी महिन्यातही हीच अवस्था होती. त्यामुळे वाढीव दराची प्रतिक्षा करुन आता आहे त्या दरात सोयाबीनची विक्री असा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकही वाढली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन दराबाबत घडत आहे ते सबंध हंगामात झालेले नाही. गेल्या तीन दिवसांमध्ये 300 रुपायंनी दर वाढलेले आहेत. शिवाय अणखीन दर वाढतील असा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनो ‘वेट अण्ड वॉच’
वाढीव दराच्या प्रतिक्षेत गेल्या चार महिन्यांपासून सोयाबीनची साठवणूक करण्यात आली आहे. थोड्याबहुत प्रमाणात दर वाढले तर लागलीच गरजेनुसार विक्री हे धोरण शेतकऱ्यांनी ठरवले होते. आता ब्राझिल आणि चीनमध्येही सोयाबीनची उत्पादकता घटलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली आहे. भविष्यात दर वाढतील. विक्रमी दराचा लाभ घ्यावयाचा असेल तर शेतकऱ्यांना अणखीन काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
मुख्य पिकांचे असे आहेत दर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. सोयाबीनचे दर वाढल्यापासून आवकही वाढली आहे. मंगळावारी तब्बल 23 हजार पोत्यांची आवक झाली होती तर हरभऱ्याची 27 हजार पोत्यांची आवक झाली होती. यापाठोपाठ तुरीची आवक सुरु झाली आहे. तूरीला हमीभाव केंद्रावर जो दर तोच खुल्या बाजारात मिळत आहे.
संबंधित बातम्या :
खरीप हंगाम : नुकसानीचा उर्वरीत निधीही जिल्ह्यांकडे वर्ग, आता नेमकी प्रक्रिया काय?
तयारी खरिपाची : कृषी विभागाच्या नियोजनाला शेतकऱ्यांची साथ, बियाणाची टंचाई भासणार नाही खरिपात
कांदा तेजीतच… झुकेगा नहीं ये..!, केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयानंतर काय आहे चित्र?