Latur Market : सोयाबीन दोन दिवस स्थिरवाल्यानंतर पुन्हा दरात घसरण, तुरीला मात्र हमीभावाप्रमाणे दर
गेल्या 10 दिवसांमध्ये केवळ दोनच दिवस सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले होते. त्यामुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दरातील लहरीपणा काय असतो याची प्रचिती शेतकऱ्यांना आली आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 100 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक ही कायम आहे. सोयाबीन हे 7 हजार 400 वर स्थिर होईल असे चित्र होते पण शुक्रवारी 50 रुपये आणि शनिवारी 100 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत.
लातूर : गेल्या 10 दिवसांमध्ये केवळ दोनच दिवस (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले होते. त्यामुळे (Soybean Stock) साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दरातील लहरीपणा काय असतो याची प्रचिती शेतकऱ्यांना आली आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 100 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक ही कायम आहे. सोयाबीन हे 7 हजार 400 वर स्थिर होईल असे चित्र होते पण शुक्रवारी 50 रुपये आणि शनिवारी 100 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत. त्यामुळे आता सोमवारी काय दर राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे (Toor Rate) तुरीच्या दरात वाढ झाली असून हमीभाव केंद्रावरील आणि खुल्या बाजारपेठेतील दर हे समानच झाले आहेत. मात्र, खरेदी केंद्रावरील किचकट प्रक्रिया यामुळे शेतकरी हे खुल्या बाजारातच तुरीची विक्री करीत आहेत.
आठवड्यात असे राहिले सोयाबीनचे चित्र
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात तब्बल 400 रुपयांची वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर मात्र, सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले होते. दर वाढताच 15 ते 18 हजार पोत्यांवरील आवक थेट 30 हजार पोत्यांपर्यंत गेली होती. बाजारपेठेत केवळ सोयाबीनच्या दराचीच चर्चा राहिलेली आहे. गतआठवड्यामध्येही शनिवारीच सोयाबीनचे दर घसरले होते तर या आठवड्यातही शनिवारीच 100 रुपायांची घसरण झालेली आहे. त्यामुळे सोमवारी काय दर राहतो हे पहावे लागणार आहे.
तुरीच्या दरात वाढ, खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
खरीप हंगामातील तुरीची आवक वाढली असून सध्या हमीभाव केंद्राप्रमाणेच खुल्या बाजारपेठेत तुरीला दर मिळत आहे. राज्यात खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीला 5 हजार 800 असा दर होता. मात्र, दोन महिन्यांमध्येच तुरीला 6 हजार 300 प्रमाणे दर मिळू लागला आहे.पण खरेदी केंद्रापेक्षा शेतकऱ्यांचा कल हा खुल्या बाजारपेठेतच आहे. खरेदी केंद्रावरील किचकट प्रक्रिया यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडेच विक्री करुन रोख पट्टी घेत आहे.
सरासरीप्रमाणे सध्याचा दर
सोयाबीनच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढत आहेत. सध्याचा दर याच नव्हे तर गत हंगामातही मिळालेला नव्हता. पण यंदा शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवल्यामुळे दरात वाढ तर झाली आहे पण शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढत आहेत. सध्याचे दर हे सोयाबीन विक्रीसाठी चांगले आहेत पण अजूनही शेतकऱ्यांचा भर हा साठवणूकीवरच आहे. दोन दिवसांमध्ये 150 रुपयांनी दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याची वेळ आल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?