देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’

वाढीव उत्पादनापेक्षा आता महत्व आहे ते शेतीमालाला बाजारपेठेत काय दर आहे त्याला. यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात तर मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची. मात्र, हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला कवडीमोल दर मिळाला होता.

देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा 'तो' एकच निर्णय ठरला 'टर्निंग पॉईंट'
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:35 AM

वाशिम : वाढीव उत्पादनापेक्षा आता महत्व आहे ते (Agricultural Price) शेतीमालाला बाजारपेठेत काय दर आहे त्याला. यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या (Decrease in production) उत्पादनात तर मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची. मात्र, हंगामाच्या सुरवातीला (Soybean) सोयाबीनला कवडीमोल दर मिळाला होता. उत्पादन घटूनही ही परस्थिती ओढावल्याने शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाला तरच विक्री हा निर्धार केला होता. त्यामुळेच सातत्याने दरात चढ-उतार पाहवयास मिळाले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अखेर सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. दिवाळी नंतर 4 हजार 500 असलेले सोयाबीन थेट 6 हजारावरच येऊन ठेपले असे असतानाही सोयाबीन विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत सोयाबीनला मागणी कायम आहे. जानेवारी महिन्यात स्थिरावलेल्या दरात आता पुन्हा वाढ होत आहे. हंगामाच्या सुरवातीला नाही पण अंतिम टप्प्यात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि तुरीची आवक वाढत आहे. असे असले तरी शेतीमालाच्या किमती पाहूनच शेतकरी आवक सुरु ठेवत आहे. जानेवरी महिन्यामध्ये सोयाबीनचे दर हे 5 हजार 800 वरच स्थिरावले होते. त्यामुळे सोयाबीन विक्री की साठवणूक या संभ्रम अवस्थेमध्ये शेतकरी होते. मात्र, त्या दरम्यान घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. आता सोयाबीन 6 हजारावर गेले आहे तर नव्याने दाखल होत असलेली तूर 6 हजार 200 रुपयांवर आहे.

शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा कायम

यंदाच्या हंगामात 4 हजार 500 रुपयांवर असलेले सोयाबीन आता 6 हजारावर येऊन ठेपले आहे. असे असतानाही 7 हजारावर दर हाच योग्य राहणार असल्याची भूमिका शेतकरी घेत आहे. किमान 7 हजार रुपये क्विंटलला दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मध्यंतरी दर स्थिर झाल्यानंतर अनेकांनी आहे त्याच दराचा आधार घेतला पण आता वाढ होताच शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांना सल्ला..!

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही सोयाबीनची अपेक्षित आवक झालेली नाही. शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीनची साठवणूकच केलेली आहे. शिवाय यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तरच फायद्याचे राहणार आहे. सध्याचा दर हा सरासरी प्रमाणे आहे. भविष्यात साठवणूक केलेले आणि उन्हाळी हंगामातल्या सोयाबीनची आवक एकदाच वाढली तर दर घटण्याचा धोका आहे. त्यामुळे साठवूकीपेक्षा विक्रीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

सरकारला दूधापेक्षा दारू महत्वाची, मद्य निर्णयाबद्दल काय आहे दूध संघाचे धोरण?

Untimely Rain : धोका कायम, भंडाऱ्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पिकांची घ्यावी लागणार काळजी

Chilly : भंडाऱ्याच्या सेवकरामांना कळाले बाजारपेठेचे महत्व, भंडाऱ्याची मिरची थेट दिल्ली दरबारी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.