Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दरवाढीमध्ये सातत्य राहील असा आशावाद शेतकऱ्यांना होता मात्र, आता तीन दिवसानंतरही सोयाबीनच्या दरात ना वाढ झाली ना घसरण. 6 हजार 500 रुपयांवरच सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले आहेत.

Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय..!
आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:21 PM

लातूर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दरवाढीमध्ये सातत्य राहील असा आशावाद शेतकऱ्यांना होता मात्र, आता तीन दिवसानंतरही सोयाबीनच्या दरात ना वाढ झाली ना घसरण. 6 हजार 500 रुपयांवरच सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले आहेत. सध्या सोयाबीनचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. शिवाय दरातही वाढ झाली असल्याने आता अधिकचा धोका न पत्करता शेतकरी (Soybean Stock) साठवणूक केलेल्या मालाची विक्री करु लागले आहेत. कारण चार दिवसांपासून 15 ते 20 हजार पोत्यांची आवक सुरु होती तर बुधवारी 22 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे आता कुठेतरी आहे त्या दरावर समाधान मानत शेतकरी हे विक्रीवर भर देत आहेत. सोयाबीनसह बाजारपेठेत तूर, (Rabi Season) रब्बी हंगामातील हरभरा, या पिकांची आवक सुरु झाली आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे तर भविष्यात उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होईल असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हरभऱ्याचे अधिकचे उत्पन्न मिळूनही शेतकऱ्यांची निराशा

रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी सुरु झाली आहे. एवढेच नाही तर गेल्या आठवड्यापासून बाजार समितीमध्ये आवकही सुरु झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 20 ते 25 हजार पोत्यांची आवक होत आहे. ही सुरवात असून भविष्यात यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांना आहे. हरभऱ्याला 5 हजार 400 हा हमीभाव ठरवण्यात आला आहे असे असाताना शेतकऱ्यांना खुल्या बाजारात केवळ 4 हजार 600 रुपायांनी विक्री करावी लागत आहे. त्यामुळे सराकारने त्वरीक हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

या पिकांची आवक वाढली

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोयाबीन या पिकासाठी मोठी बाजारपेठ मानली जाते. शहरात तेल प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात असून येथील बाजारपेठेतच सोयाबीनचे दर ठरतात. सध्या सोयाबीन, तूर, हरभरा, मूग, उडीद या पिकांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनची आवक ही अंतिम टप्प्यातील असली तरी आताच साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढले जात आहे. तुरीला 6 हजार 100, सोयाबीनला 6 हजार 500 तर हरभऱ्याला 4 हजार 600 चा दर येथील बाजार समितीमध्ये मिळत आहे.

सोयाबीनची आवक 20 हजार पोत्यांवर

सोयाबीनची आवक ही कायम दरावर अवलंबून राहिलेली आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीनचे दर हे 6 हजारापेक्षा कमी होते. त्या दरम्यान, 10 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक झाली नव्हती. पण गेल्या 8 दिवसांपासून सोयाबीन हे 6 हजार 500 वर येऊन ठेपले आहे. असे असताना आवकी ही 20 पोत्यांच्या घरात गेली आहे. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरीही विक्रीवर भर देत आहे.

संबंधित बातम्या :

‘जलयुक्त’योजनेतील पाणी परळीतच ‘मुरलं’ अन् चौकशीत ते बाहेरही ‘आलं’, कृषी सहसंचालकानीच दिले वसुलीचे आदेश

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर ‘वन’, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी अन् उन्हाळी हंगामात झाली ‘ही’ क्रांती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.