Soybean : धास्ती रासायनिक खताची अन् दर वाढले सोयाबीन बियाणाचे, खरिपाच्या तोंडावर ‘महाबीज’चा निर्णय
महाबीज बियाणालाच शेतकऱ्यांकडून अधिकची मागणी असते. मात्र, यंदा हेच सोयाबीनते बियाणे घेण्याासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाबीज प्रशासनाने आपल्या बियाणांचे दर घोषित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महत्वाचे असणारे सोयाबीनच्या किंमतीमध्ये तब्बल 40 टक्के अशी वाढ केली आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणाची 30 किलोच्या बॅगेसाठी 2 हजार 250 रुपये मोजावे लागत होते आता हीच बॅग तब्बल 2 हजार रुपयांनी महागली आहे.
अकोला : (Kharif Season) खरीप हंगामासाठी यंदा सर्वकाही वेळेवर होत असले तरी शेतकऱ्यांना महागाईला सामोरे जावेच लागणार आहे. आतापर्यंत (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा तुटवडा भासेल किंवा पुरवठा झाला तरी वाढीव दरानेच खरेदी करावे लागणार अशी भिती शेतकऱ्यांच्या मनात होती. पण झाले उलटेच, सध्या तरी रासायनिक खतांचे दर स्थिर आहेत पण महाबीजने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी मात्र अस्थिर झाला आहे. महाबीजने (Soybean Seed) सोयाबीन बियाणांच्या किंमतीमध्ये तब्बल 40 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच 30 किलो सोयाबीन बियाणाच्या मागे जवळपास 1 हजार 700 रुपये शेतकऱ्यांना अधिकचे मोजावे लागणार आहेत. गतवर्षी महाबीज सोयाबीनची बॅग ही 2 हजार 250 रुपयांना होती तर आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 3 हजार 900 रुपये मोजावे लागत आहेत. ऐन खरिपाच्या तोंडावरच हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना हंगाम सुरु होण्यापूर्वीच दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
असे राहणार आता महाबीजच्या बियाणांचे दर
महाबीज बियाणालाच शेतकऱ्यांकडून अधिकची मागणी असते. मात्र, यंदा हेच सोयाबीनते बियाणे घेण्याासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाबीज प्रशासनाने आपल्या बियाणांचे दर घोषित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महत्वाचे असणारे सोयाबीनच्या किंमतीमध्ये तब्बल 40 टक्के अशी वाढ केली आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणाची 30 किलोच्या बॅगेसाठी 2 हजार 250 रुपये मोजावे लागत होते आता हीच बॅग तब्बल 2 हजार रुपयांनी महागली आहे. गतवर्षी काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे अपेक्षित असे कच्चे बियाणे मिळाले नाही. त्यामुळे महाबीजला पुन्हा उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला होता.
यामुळे वाढले बियाणांचे दर
महाबीज बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवत असताना सोयाबीनचे जे दर असतात त्यावर काही टक्के बोनस देऊन कच्चे बियाणे विकत घेतले जाते. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या दरम्यानचे दर, बियाणांवर प्रक्रिया, पॅकिंग आणि तयार झालेले बियाणे विक्रेत्यांपर्यत पोहचवण्यासाठी येणारा खर्च पाहता ही वाढ करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम हा सोयाबीन बियाणावर झालेला आहे.
शेतकऱ्यांकडे पर्याय काय ?
वाढत्या महागाईमुळे हे होणारच आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे घेण्यासाठी अधिकचे पैसे हे मोजावे लागणारच आहेत पण पिकलेल्या शेतीमालाच्या दराचे काय? हा सवाल कायम आहे. त्यामुळे उत्पादनावर कमी खर्च होईल या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देणे गरजेचे आहे. त्याकरिता पेरणी पूर्वी बियाणांची उगवण पाहिली तर उताराही कमी येत नाही. मात्र, पेरणीचे नियोजन हे पूर्वीपासूनच असले तरी शेतकऱ्यांची परिश्रम आणि खर्चही कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.