Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 22 हजार पोत्यांची आवक आणि 6 हजार 300 चा दर हाच कायम आहे. सध्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहे तुरीचे पीक.
लातूर : (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही (Soybean) सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 22 हजार पोत्यांची आवक आणि 6 हजार 300 चा दर हाच कायम आहे. सध्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहे तुरीचे पीक. (Kharif Season) खरीप हंगामातील तूर हे अंतिम पीक आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून तुरीच्या दरात हळुहळु का होईना वाढ ही होत आहे. 1 जानेवारीपूर्वी राज्यात हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 5 हजार 800 पर्यंत होते. पण आता 6 हजार 500 पर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता तुरीच्या दराकडे असून वाढत्या दरानुसारच तुरीचीही आवक ठरली जाणार आहे.
जुनं तेच सोनं असंच काहीस तुरीचं
सध्या बाजारपेठेत नवीन आणि जुन्या तुरीचीही आवक सुरु आहे. मात्र, जुन्या तुरीलाच अधिकचा दर आहे. कारण यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे कमी असते तर तूर ही वाळलेली असते. त्यामुळे व्यापारी हे जुन्या तुरीलाच पसंती देतात. तर दुसरीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात नवीन तुरीला अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे. यामध्ये नुकसान तर झालेच पण त्यानंतरही ऊन नसल्यामुळे तूर पूर्णपणे वाळलेली नाही. परिणाम यामध्ये 10 टक्केपेक्षा अधिकची आर्द्रता आहे. त्यामुळे जुन्या तुरीला 6 हजार 400 तर नवीन तुरीला 6 हजार 200 पर्यंतचा दर मिळत आहे. आता कुठे हंगाम सुरु झाला आहे. बदलत्या दराप्रमाणे बाजारपेठेतील आवकचे आकडेही बदलणारच आहेत.
टप्प्याटप्प्याने नवीन तुरीची आवक
हंगामाच्या सुरवातीलाच आवक मोठ्या प्रमाणात झाली तर दर घसरतील यामुळे टप्प्याटप्प्याने तुरीची आवक बाजारपेठेत सुरु आहे. सोयाबीन, कापूस याबाबत शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती तीच पध्दत आता तुरीबाबतही राबवली जात आहे. सुरवातीला 6 हजाराच्या घरात दर असले तरी भविष्यात मागणीपेक्षा कमी पुरवठा झाला तर दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे तुरीची आवक सुरु होण्यापूर्वीच केंद्र सरकारने केलेली आवक याचा परिणाम दरावर होणार असल्याचे सांगितले जात होते पण प्रत्यक्षात आता हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणेच तुरीची विक्री महत्वाचे राहणार आहे.