लातूर : आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मनात आले तरच (arrivals increase) सोयाबीनची आवक होत होती. कारण भविष्यात (Soybean rates) सोयाबीनचे दर वाढणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यानुसार दिवाळीनंतर झाले ही तसेच. सोयाबीनच्या दरात 2 हजार रुपयांनी वाढही झाली. मात्र, (farmers) शेतकऱ्यांच्याही अपेक्षा ह्या वाढत गेल्या. पण सध्या बाजारपेठेतले चित्र हे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे, कारण, सोयापेंड आयातीला पूर्णविराम देण्यात आला आहे. एवढेच नाही तर आता प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांवरील साठा मर्यादेची अटही शिथिल करण्यात आली आहे. असे असतानाही सोयाबीनचे दर हे घसरतच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून 6 हजार 200 स्थिर असलेले दर गुरुवारी मात्र, अणखीन 200 रुपायांनी घसरले आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना आत्मविश्वास होता की, सोयाबीनच्या दरात ही वाढ होणार मात्र, आता सोयापेंड आयातीला स्थगिती देऊनही त्याचा परिणाम दरावर झालेला नाही. उलट सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 200 वर सोयाबीन हे स्थिरावले होते पण गुरुवारी 200 रुपयांची घसरण झाली आहे. सोयापेंड आयातीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर दरात वाढ होईल असे चित्र होते. पण वाढ तर सोडाच आता दर हे स्थिरही राहत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याचा दर भविष्यातही राहतो की नाही त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.
यंदा उन्हाळी हंगामातही सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनाचा प्रयोग उन्हाळी हंगामात केला जात होता. यंदा मात्र, पाण्याची उपलब्धता आणि रब्बी हंगामातील लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिलेला आहे. शिवाय मध्यंतरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा आहे. यंदा कधी नव्हे तेच उन्हाळी हंगामातील पेरा हा वाढलेला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली तर मात्र, सोयाबीनचे दर अणखीन घसरणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहेच. आता सोयाबीनची आवक वाढली असतानाही मागणी घटली आहे. मध्यंतरी शेतकरी हे साठवणूकीवर भर देत होते. पण आता घटत्या दरामुळे सोयाबीनचे भवितव्य काय राहणार यामुळे विक्रीवर भर दिला जात आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6170 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6126 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4928 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7400, चमकी मूग 7200, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7503 एवढा राहिला होता.