Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले आवकमध्ये चढ-उतार, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला..!
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला वाढलेले सोयाबीनचे दर महिन्याच्या अखेरीस घट होऊन स्थिरावले आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी शेतकऱ्यांनी अद्यापही साठवणूकीवरच भर दिलेला आहे. असे असतानाच दरामधील तफावत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. 6 हजार रुपये हा सरासरी दर मानला जात असतानाही शेतकऱ्यांना अजूनही वाढीव दराची अपेक्षा आहे.
लातूर : जानेवारी महिन्याच्या सुरवातीला वाढलेले (Soybean Rate) सोयाबीनचे दर महिन्याच्या अखेरीस घट होऊन स्थिरावले आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी शेतकऱ्यांनी अद्यापही साठवणूकीवरच भर दिलेला आहे. असे असतानाच दरामधील तफावत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. 6 हजार रुपये हा सरासरी दर मानला जात असतानाही (Farmer) शेतकऱ्यांना अजूनही वाढीव दराची अपेक्षा आहे. मात्र, बाजारपेठेतील घटलेली मागणी आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र याचा विचार करता शेतकऱ्यांनी अधिक वाढीव दराची अपेक्षा न करता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे महत्वाचे आहे. सध्या (Latur) लातूर सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 ते 22 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. ही आवक प्रमाणात असली तरी गतवर्षी सारखी आवक हंगाम सुरु होऊन आतापर्यंत झालेली नाही. यावरुन अद्यापही शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा आहेच. ही अपेक्षा ठेवत असताना सध्याच्या बाजारपेठेचे आणि भविष्यातील सोयाबीनचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
दर 6 हजार 200 रुपयांवरच
गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 रुपयांवरच स्थिरावलेले आहेत. तर बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. सध्या केवळ तूर आणि सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरीकडे कापूस पीक अंतिम टप्प्यात आहे. सोयाबीनला 6 हजार 200 रुपये हा सरासरी दर असतानाही यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण बाजारपेठेचे चित्र पाहता हेच दर अणखीन काही दिवस राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचा धोका न घेता टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करणे गरजेचे आहे.
तूरीच्या दराने गाठले हमीभावाला
खरीप हंगामातील अंतिम असलेले तूर पीकाचीही आवक सुरु झाली आहे. सुरवातीला हमीभावापेक्षा 500 रुपायांनी तूरीचे दर हे कमी होते. पण आता यामध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे सरकारच्या माध्यमातून हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. केंद्रावर तूरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच तुरीचे दर हे हमीभावापर्यंत येऊन ठेपले आहेत. त्यामुळे हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेतच तूरीची अधिकची विक्री होत आहे. शिवाय चांगला माल दाखल होताच पुन्हा दरात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
उन्हाळी हंगामातही सोयाबीनच आघाडीवर
खरिपात सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी ते उन्हाळी हंगामातून भरुन काढण्याचा निर्धार केला आहे. यंदा खरिपाचे क्षेत्र रिकामे होताच रब्बी हंगामातील पिकांचा पेरा करण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. कारण शेतामध्ये जागोजागी पाणी साचलेले होते. त्यामुळे वाफसा होताच ज्वारी पेरणीला अधिकचा उशिर झाला म्हणून शेतकऱ्यांनी थेट उन्हाळी हंगामात हरभरा आणि सोयाबीनवर भर दिलेला आहे. सध्या उन्हाळी सोयाबीन हे फुलोऱ्यात आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान उन्हाळी सोयाबीनमधून भरुन निघणार हे पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Jalna : ‘सीड हब’मध्ये आता ‘सीड पार्क’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेमका फायदा काय ?