कोरोनामुळे राज्यात संचारबंदी, बियाणे, खत मिळत नाहीये; मग ‘या’ नंबरवर कॉल करा

खत, बियाणे यांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. (farmers complaints agriculture minister dadaji bhuse)

कोरोनामुळे राज्यात संचारबंदी, बियाणे, खत मिळत नाहीये; मग 'या' नंबरवर कॉल करा
FARMER
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 10:38 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. मृतांचा आकडासुद्धा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने कोरोनाला थोवण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये व्यापारी, कामगार, मजूर यांना फटका बसत आहे. तसेच शेतकऱ्यांनासुद्धा शेतीविषयक सामान खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. (State agriculture department set up control room for complaints of supply of seeds fertilizers given toll free number to farmers idea by agriculture minister Dadaji Bhuse)

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले होते निर्देश

सध्या असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, तसेच शेतीचे इतर सामान यांचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तसे निर्देश दिले होते.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करा

खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट टोल फ्री नंबरवर कॉल करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 8446117500 हा भ्रमणध्वनी क्रमांक असून 18002334000 हा टोल फ्री क्रमांक आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी नियंत्रण कक्षाशी वरील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. हे नंबर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील. सोबतच अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवरसुद्धा ती नोंदवता येईल.

साठेबाजी, किंतमीविषयी तक्रार असल्यास शक्यतो मेल करावा

यावेळी टोल फ्री जाहीर करताना राज्य सरकारने शेतीविषयक सामानांची किंमत किंवा साठेबाजीबाबत काही तक्रारी असतील तर शक्यतो नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा असे राज्य सरकारने आवाहन केले आहे. तसेच सर्व तक्रार कागदावर लिहून त्याचे छायाचित्र शक्य असेल तर व्हॉट्सअ‌ॅपवर किंवा ई-मेलवर पाठवावी. त्यामुळे तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल, असेसुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तरीसुद्धा काहीही अडचण नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेतकऱ्यांना औषधी, खते, बियाणे तसेच इतर शेतीविषयक उपकरणं वेळेवर मिळत नव्हते. याच गोष्टीचा विचार करुन कृषी विभागाने वरील संपर्क क्रमांक जारी केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

मॉडर्न शेतीतून शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा, प्रीसिजन फार्मिंगमधून वाढेल उत्पादन

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

या औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळवा तीन पट अधिक नफा, वर्षातून तीन ते चार वेळा येते पीक

(State agriculture department set up control room for complaints of supply of seeds fertilizers given toll free number to farmers idea by agriculture minister Dadaji Bhuse)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.